युद्धजन्य परिस्थितीचा फायदा उचलून गॅसची चोरी, सिलेंडर घेण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची तपासणी करावी? जाणून घ्या

इराण-अमेरिका तणावामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती असतानाच सिलेंडर चोरीच्या तक्रारी वाढल्या आहेत. घरगुती LPG सिलेंडरचे अचूक वजन किती असावे आणि डिलिव्हरी घेताना फसवणूक कशी टाळावी, हे जाणून घ्या.

| Updated on: Mar 11, 2026 | 12:34 PM
1 / 6
सध्या इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे जागतिक बाजारपेठेत मोठी खळबळ माजली आहे. युद्धाच्या सावटाखाली खनिज तेल आणि गॅस वाहतुकीचा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) बंद झाली आहे. त्याचा परिणाम जगभरासह भारतालाही बसत आहे.

2 / 6
सध्या देशात एलपीजी (LPG) आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा खंडित होण्याची भीती वर्तवली जात आहे. या परिस्थितीचा फायदा घेत काही ठिकाणी गॅस सिलिंडरच्या डिलिव्हरी दरम्यान गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

3 / 6
अनेक ग्राहकांना वजनात कमी सिलेंडर मिळत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे, सिलेंडर स्वीकारताना त्याचे योग्य वजन माहित असणे अत्यंत आवश्यक आहे. एका घरगुती LPG सिलेंडरचे एकूण वजन सुमारे २९.७ किलो असणे आवश्यक आहे.

4 / 6
यात LPG गॅसचे वजन १४.२ किलो असते. तर रिकाम्या सिलेंडरचे वजन सरासरी १५.५ किलो इतके असते. जर सिलेंडरचे एकूण वजन २९.७ किलोपेक्षा कमी भरत असेल, तर समजून जा की त्यामध्ये गॅसचे प्रमाण कमी आहे.

5 / 6
यासाठी सिलेंडर स्वीकारण्यापूर्वी डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीला तुमच्यासमोर काट्यावर वजन करण्यास सांगा. सर्व डिलिव्हरी वाहनांकडे वजन काटा असणे बंधनकारक आहे. याची खात्री करण्यासाठी तुम्ही घरी २०० ते ३०० रुपयांमध्ये मिळणारा साधा हुक-बेस्ड डिजीटल वजन काटा ठेवू शकता.

6 / 6
प्रत्येक सिलिंडरच्या लोखंडी पट्टीवर त्याचे रिकामे वजन (Tare Weight) लिहिलेले असते. एकूण वजनातून हे वजन वजा केल्यास तुम्हाला गॅसचे अचूक प्रमाण समजते. अनेकदा सील बंद असूनही गॅसची चोरी झालेली असू शकते. त्यामुळे केवळ सील पाहून समाधान मानू नका. वजन करण्यासोबतच ओल्या हाताने किंवा साबणाच्या पाण्याने व्हॉल्व्हजवळ गळती नाही ना, याचीही खात्री करून घ्या.

Follow Us