आजार की आणखी काही? प्रसिद्ध अभिनेत्रीचा इतका बदलला लूक; चाहत्यांना पडला प्रश्न

नुकत्याच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात या अभिनेत्रीच्या लूकची चर्चा झाली. सोशल मीडियावर जेव्हा या अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल झाला, तेव्हा काहींना तिला ओळखणं कठीण झालं होतं.

| Updated on: Mar 12, 2026 | 3:37 PM
1 / 5
नुकताच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अनेक कलाकार उपस्थित होते. रेड कार्पेटवर मालिकेतील हिरोसोबत पोहोचलेल्या या अभिनेत्रीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

नुकताच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अनेक कलाकार उपस्थित होते. रेड कार्पेटवर मालिकेतील हिरोसोबत पोहोचलेल्या या अभिनेत्रीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

2 / 5

'शुभविवाह' मालिकेत भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुरा देशपांडे तिच्या बदललेल्या लूकमध्ये चर्चेत आली आहे. यशोमन आपटेसोबत ती पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ द्यायला आली तेव्हा तिच्या बदललेल्या लूकची चर्चा झाली.

3 / 5

पुरस्कार सोहळ्यातील मधुरा देशपांडेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी वाढलेल्या वजनावरून तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.

4 / 5

मधुराच्या चाहत्यांनी कमेंट्समध्ये तिची बाजू घेतली आहे. 'जाड झाली असली तरी छान दिसतेय ती. काही समस्या असू शकतात, प्रेग्नंसी किंवा हार्मोनल समस्यांमुळेही वजन वाढू शकतं', असं एकाने म्हटलंय. तर 'आजारी असू शकते, काहीतरी प्रॉब्लेम असेल', असं दुसऱ्याने लिहिलं आहे.

5 / 5

मधुरा देशपांडेनं मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलंय. 2018 मध्ये तिने आशय गोखलेसोबत लग्न केलं. मधुराने 'इथेच टाका तंबू' या मालिकेतून कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर तिने बस स्टॉप, गुलाबजाम यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us