आवडीनं बनवत होते मॅगी, शिजवताना आढळल्या अळ्या, कल्याणमध्ये चिमुकल्यासोबत किळसवाणा प्रकार
कल्याणमध्ये मॅगी शिजवताना त्यात चक्क आळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पॅकेटवरील एक्सपायरी डेट फेब्रुवारी २०२७ असतानाही हा प्रकार घडल्याने मोठ्या ब्रँडच्या खाद्यगुणवत्तेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कल्याणमध्ये मॅगी शिजवत असताना त्यामध्ये चक्क आळ्या आढळल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे संबंधित मॅगीच्या पॅकेटवर फेब्रुवारी 2027 ही एक्सपायरी तारीख नमूद असल्याचे सांगण्यात येत आहे.
तुकाराम मुंढे यांचं FDA खातं महाराष्ट्रभर कारवाई करत असताना मोठ्या ब्रँडच्या उत्पादनात आळ्या आढळल्याने खाद्यगुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नमुना तपासणीची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, सदरील प्रकार हा एका चिमुकल्याने सांगितला आहे. "रात्री एक वाजता गणपती विसर्जन करुन आल्यावर भूक लागली होती. त्यानंतर आम्ही मॅगी बनवली आणि खायला घेतल्यावर सदरील प्रकार समोर आला. "
"दोन अळ्या आढळून आल्यानंतर आम्ही पॅकेटवरची एक्स्पायरी डेट तपासून पाहिली तर त्यावर फेब्रुवारी २०२७ तारीख होती. त्यामुळे एवढ्या लवकर कशी काय खराब झाली."
"मॅगी बनवणारी कंपनी दावा करते की आम्ही स्वच्छतेचं पालन करतो तर मग हा जो प्रकार झाला आहे," तो कसा झाला असा प्रश्न ग्राहकाने विचारला आहे.
मॅगी मोठा ब्रँन्ड आहे सांगते तर मग गेल्याच महिन्यात खरेदी केलेल्या पाकिटांमध्ये अळ्या कशा? हे जर चुकून आम्ही खाल्लं असतं आम्ही रुग्णालयात असतो, तर काय झालं असंत? याचं उत्तर मॅगीनेच दिलं पाहिजे, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.