लहानपणी खेळताना चुकून कानात गेले होते लोहचुंबक, १२ वर्षांनी डोके दुख लागले, अखेर डॉक्टरांनी केले ऑपरेशन

लहान मुले खेळण्यांशी खेळत असताना त्यांच्यावर किती बारीक लक्ष ठेवणे गरजेचे असते याची प्रचिती एका घटनेतून आली आहे. एका मुलाने चार वर्षांचा असताना खेळताना चुकून कानात घातलेले लोहचुंबक १२ वर्षे कानातच अडकून होते. अखेर..

| Updated on: Nov 02, 2026 | 9:09 PM
1 / 5
एका १६ वर्षांच्या मुलाच्या सतत डोक्यात दुख लागल्याने त्याला डॉक्टरांकडे नेले असता, मुलाच्या तपासणीनंतर त्याच्या कानात चुंबक असल्याचे आढळले.त्यावेळी त्याच्या आईने सांगितले की  तो लहानपणी चेसच्या लोहचुंबकाशी खेळत असायचा त्यावेळी त्याने कानात हे चुंबक टाकले असावे. त्यानंतर १२ वर्षे हे चुंबक कानातच राहिले.

2 / 5

हा मुलगा १६ वर्षांचा झाल्यानंतर हे चुंबक कानात राहिल्याने त्याला डोकेदुखीचा त्रास सुरु झाला. डॉक्टरांनी या मुलाच्या कानाची तपासणी केली असता त्याच्या कानात गोल चुंबक दिसले.

3 / 5

या चुंबकाने या मुलाच्या कानाच्या आतील त्वचा संपूर्णपणे सडून गेली होती. सुदैवाने या मुलाच्या कानाचा पडदा सुरक्षित असल्याने धोका टळला. या मुलाच्या कानातून हे चुंबक यशस्वीपणे काढण्यात आले.

4 / 5

मीरा रोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कोणतीही इजा न करता हे चुंबक यशस्वीरीत्या बाहेर काढले.

5 / 5

लहान मुले खेळत असताना त्यांना कोणतीही छोटी वस्तू देऊ नये. अशी वस्तू जर कानात किंवा घशात अडकली आणि श्वास नलिकेत गेली तर मृत्यूही होऊ शकतो असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us