Mahabharat : वयाच्या 56 व्या वर्षी सुद्धा महाभारतातल्या भीमाच्या मुलीच्या सौंदर्यासमोर अभिनेत्री फिक्या, अक्षय कुमारशी होणार होतं लग्न
Praveen Kumar Sobti Daughter : रामानंद सागर यांच्या 'रामायण'च जे क्रेझ होतं. तितकीच क्रेझ बी.आर.चोपडा यांच्या 'महाभारत' मालिकेची होती. या शो मध्ये प्रवीण कुमार सोबतीने भीमाची भूमिका साकारलेली. या रोलमुळे ते घराघरात लोकप्रिय झाले.

महाभारतात भीमाचा रोल साकारणाऱ्या प्रवीण कुमार यांच्याबद्दल लोकांना माहित आहे. पण त्यांच्या एकलुत्या एक मुलीबद्दल फार कमी जणांना ठाऊक आहे. प्रवीण कुमार सोबती यांची मुलगी निपुणिका लूक्समध्ये कुठल्या हिरॉइनपेक्षा कमी नाही.

निपुणिका ही प्रवीण कुमार सोबती यांची एकुलती एक मुलगी आहे. वडिल नावाजलेले कलाकार होते. पण निपुणिका नेहमीच अभिनयापासून लांब राहिली. तिने एक वेगळं प्रोफेशन निवडलेलं.

निपुणिका सोबतीने केबिन क्रू मध्ये करियर बनवलं. पण नंतर तिने ती नोकरी सोडली. निपुणिका आता 56 वर्षांची आहे. पण तिचं सौंदर्य आजही सेम तसच आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार निपुणिका सोबती आणि आणि अक्षय कुमार रिलेशनशिपमध्ये होते.

निपुणिकाला अक्षय कुमारने काही काळ डेट केलं होतं, असं बोललं जातं. पण काही कारणाने त्यांचं लग्न झालं नाही. नातं तुटलं. अक्षय कुमार कधीच या बातम्यांवर React झाला नाही.

रिपोर्ट्स नुसार निपुणिका सध्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे. तिने नितीश सेठ नावाच्या व्यक्तीशी लग्न केलं. त्यांना एक मुलगी आहे नंदिका सेठ. ग्लॅमरच्या दुनियेपासून लांब निपुणिका कुटुंबासोबत मुंबईत राहते.