गणेशोत्सवापूर्वीच नंदुरबारमध्ये रेकॉर्डब्रेक, पेणलाही टाकले मागे, या राज्यांमधूनही मागणी

नंदुरबार जिल्ह्यात गणेशोत्सवाची तयारी जोरदार सुरू आहे. चार हजारांहून अधिक गणेश मूर्तींचे उत्पादन अपेक्षित आहे, ज्यासाठी १५०० पेक्षा जास्त कामगार काम करत आहेत. महाराष्ट्रात पेणनंतर सर्वाधिक मूर्ती येथे तयार होतात.

| Updated on: Jul 15, 2025 | 4:24 PM
1 / 8
नंदुरबार जिल्ह्यात गणेशोत्सवाची तयारी जोरदार सुरू झाली आहे. शहरातील मूर्तिकारांनी गणेश मूर्ती बनवण्याच्या कामाला वेग दिला असून, यंदा नंदुरबार शहरात 4 हजार पेक्षा अधिक गणेश मूर्ती तयार होणार आहेत.

2 / 8
या कामासाठी सुमारे 1,500 हून अधिक मजूर अहोरात्र कष्ट घेत आहेत. त्यांच्या हातांनी वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर आणि रुबाबदार गणेश मूर्ती साकारल्या जात आहेत. महाराष्ट्रात पेणनंतर सर्वाधिक गणेश मूर्ती नंदुरबारमध्येच तयार केल्या जात असल्याने या जिल्ह्याला आता गणेश मूर्तींचे प्रमुख केंद्र म्हणून ओळख मिळत आहे.

3 / 8
नंदुरबारमधील कारखान्यात तयार होणाऱ्या गणेश मूर्तींना महाराष्ट्राबरोबरच गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान येथील गणेश मंडळांकडून मोठी मागणी आहे. अनेक मंडळे गणेश मूर्तींच्या बुकिंगसाठी थेट नंदुरबारच्या कारखान्यांमध्ये येत आहेत. या वाढत्या मागणीमुळे नंदुरबारच्या मूर्तिकलेची गुणवत्ता आणि सौंदर्य पाहायला मिळते.

4 / 8
लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेला गणेशोत्सव आज मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. त्यामुळे गणेश मूर्तीही मोठ्या उंचीच्या तयार केल्या जात आहेत. पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) च्या वापरावरून अनेकदा पर्यावरणाचा मुद्दा उपस्थित केला जातो.

5 / 8
यावर मूर्तिकार नारायण वाघ यांनी सांगितले की, "पीओपीमुळे पर्यावरणाला कुठलीही हानी होत नाही." यामुळे मोठ्या प्रमाणावर मूर्ती तयार करणे शक्य होते. नंदुरबार शहरातील मूर्तींना मोठी मागणी मिळत आहे. इथे तयार होणाऱ्या गणपती मूर्ती इतक्या आकर्षक आणि सुंदर आहेत की त्यांची किंमत ठरवणे कठीण होते.

6 / 8
महाराष्ट्रात गणेशोत्सव हा सर्वात मोठा उत्सव म्हणून साजरा केला जातो. नंदुरबार जिल्ह्यात लहान-मोठे असे एकूण 41 पेक्षा अधिक कारखाने असून 1,500 हून अधिक कर्मचारी गणेश मूर्ती तयार करत आहेत. नंदुरबार शहरात 8 इंचांपासून ते 23 फुटांपर्यंतच्या विविध आकारातील मूर्ती तयार करण्याचे काम युद्धपातळीवर केले जात आहे.

7 / 8
हजारो रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंतच्या गणेश मूर्ती नंदुरबार शहरात तयार होत आहेत. सध्या गणेश मंडळांकडून मूर्ती बुकिंग करणे सुरू झाले आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गणेश मूर्ती तयार होत आहेत.

8 / 8
नंदुरबार जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये गणरायाच्या सर्व रूपांच्या सुंदर आणि रुबाबदार गणेश मूर्ती पाहायला मिळत आहेत. त्यामुळे राज्यातील कानाकोपऱ्यातील गणेशभक्त नंदुरबारच्या कारखान्यांमध्ये आवर्जून हजेरी लावत आहेत.