धक्कादायक… अंदाधुंद गोळीबारात 10 जणांचा मृत्यू तर 10 जखमी… रस्त्यावर गोळ्यांचा वर्षाव कारण…
अंदाधुंद गोळीबारात तब्बल 10 जणांनी स्वतःचे प्राण गमावले आहेत तर, 10 जण जखमी असल्याची माहिती असल्याची माहिती मिळत आहे... यामध्ये महिला आणि मुलांची संख्या किती याबद्दल सध्या तपास सुरु आहे. पण घडलेल्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरणर आहे...

एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अंदाधुंद गोळीबारात तब्बल 10 जणांनी स्वतःचे प्राण गमावले आहेत तर, 10 जण जखमी असल्याची माहिती असल्याची माहिती मिळत आहे. अचानक झालेला गोळीबार आणि रस्त्यावर गोळ्यांच्या वर्षावामुळे लोकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण असल्याचं दिसून येत आहे… गोळीबार का झाला आणि कोणी केला… याचा पोलीस कसून तपास करत आहे… दिवसागणिक गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पण यामध्ये निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत…
दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गजवळील एका टाउनशिपमध्ये अंदाधुंद गोळीबार झाला, ज्यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आणि 10 जण जखमी झाले आहेत. हल्लेखोरांची ओळख आणि हल्ल्याचा हेतू सध्या अस्पष्ट असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. रविवारी, जोहान्सबर्गजवळील बेकरसडल परिसरात बंदूकधाऱ्यांनी अचानक गोळीबार केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोहान्सबर्गच्या बाहेरील भागात असलेल्या एका टाउनशिपमध्ये गोळीबारी घटना घडली आहे. हा हल्ला दक्षिण आफ्रिकेतील या महिन्यातील दुसरा मोठा सामूहिक गोळीबार आहे. दुसऱ्यांदा झालेल्या गोळीबारामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.
गौतेंग प्रांतीय पोलिस प्रवक्ते ब्रिगेडियर ब्रेंडा मुरिडिली यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 लोकांचं निधन झालं आहे. आमच्याकडे सध्या मृत्यांच्या संख्येबद्दल अधिकृत माहिती नाही लोकांना रस्त्यावरून चालत असताना गोळ्या घालण्यात आल्या. हल्ल्यामागील हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही… असं देखील पोलिसांनी सांगितलं आहे.
देशातील प्रमुख सोन्याच्या खाणींजवळ असलेल्या बेक्कर्सडाल परिसरातील एका बारजवळ ही गोळीबाराची घटना घडली. ज्या भागात गोळीबाराची घटना घडली, त्या भागात बेकायदेशीर रित्या दारुची विक्री होते. गोळीबारानंतर जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत… पोलीसांनी घटनास्थळी बंदोबस्त वाढवला आहे आणि हल्लेखोरांचा तपास सुरु करण्यात आला आहे…
सांगायचं झालं तर, यापूर्वी 6 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेची राजधानी प्रिटोरियाजवळील एका वसतिगृहावर बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला होता. त्या घटनेत तीन वर्षांच्या मुलासह 12 जणांचा मृत्यू झाला होता. सतत होत असलेल्या गोळीबारांच्या घटनेमुळे देशातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
