कोल्हापुरात पावसाचं थैमान, पंचगंगा नदी दुथडी भरून; राधानगरी धरण 75 टक्के भरलं…
Kolhapur Rain Update : राधानगरी धरण 75 टक्के भरलं, 68 बंधारे पाण्याखाली; इशारा पातळीजवळून वाहातेय पंचगंगा नदी, पाहा फोटो...
1 / 5

कोल्हापुरात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. पंचगंगा नदीचं पाणी पातळी 37 फूट पाच इंचावर वाहतं आहे.
2 / 5

39 फुटांवर पंचगंगा नदीची इशारा पातळी आहे. पंचगंगा नदी इशारा पातळीवर पोहोचायला अवघा दीड फूट कमी आहे.
3 / 5

पंचगंगा नदीचं पाणी रस्त्यावर यायला सुरुवात झाली आहे.पंचगंगा नदीचं पाणी गंगावेश ते शिवाजी पुल रस्त्यावर आलं आहे. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे.
4 / 5

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. धरण क्षेत्रासह शहर परिसरातही जोरदार पाऊस होतोय.
5 / 5

जिल्ह्यातील 68 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरण 75 टक्के भरलं आहे. आज कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us