Weather Update : देशात 12 राज्यांना तातडीचा अलर्ट, हवामान विभागाचा ताजा अंदाज आला, महाराष्ट्राला मोठा इशारा!
बंगालच्या खाडीत सध्या चक्रीवादळामुळे वारे वाहू लगले आहेत. यामुळे 19 ते 21 नोव्हेंबर या काळात पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. कोलकाता तसेच दक्षिण बंगालच्या भागात जोरदार हवा वाहू शकते.

आता पाऊस संपला असून देशभरात थंडी अवतरायला सुरुवात झालीय. कुठे कुठे गुलाबी थंडीची चाहुलही जाणवत आहे. एखाद्या राज्यात तापमानात घट होऊन थंडी तर कुठे धुकं अशी स्थिती आहे. दक्षिणेतील राज्यांत अजूनही काही ठिकाणी पाऊस पडतोय.
दरम्यान, सध्याची स्थिती लक्षात घेऊन हवामान विभागाने एकूण 12 राज्यांना अलर्ट जारी केला आहे. यातील काही राज्यांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही राज्यात धुकं पडून थंडी वाढू शकते. महाराष्ट्रासाठीही महत्त्वाचा अंदाज समोर आलाय.
राजधानी दिल्लीमध्ये हलका पाऊस होऊ शकतो. राजस्थान, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुद्दुचेरी या राज्यांतही पावसाची शक्यता आहे. तर हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांतील काही भागात दाट धुकं वाढू शकतं. बिहारमध्ये हवामान कोरडे राहू शकते.
बंगालच्या खाडीत सध्या चक्रीवादळामुळे वारे वाहू लगले आहेत. यामुळे 19 ते 21 नोव्हेंबर या काळात पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. कोलकाता तसेच दक्षिण बंगालच्या भागात जोरदार हवा वाहू शकते.
दुसरीकडे महाराष्ट्रातही काही ठिकाणी थंडी वाढतेय. तर काही ठिकाणी हवामान कोरडे आहे. सकाळी थंडी, दुपारी उन्हाचे चटके अशी स्थिती काही जिल्ह्यांत आहे. महाराष्ट्रात सध्यातरी पावसाचा अंदाज नाही.