
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. श्रीदेवी यांच्या धमाकेदार भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहेत.

नुकताच एका अभिनेत्याने श्रीदेवी यांच्याबद्दल थेट मोठा खुलासा केलाय. अभिनेता महेश ठाकुरने श्रीदेवी यांच्यासोबत मलिनी अय्यर मालिकेत काम केले. आता मोठा खुलासा महेशने केलाय.

या मालिकेत श्रीदेवी आणि महेश ठाकुर हे पती पत्नीच्या भूमिकेत होते. बोनी कपूरने प्रोड्यूस केले आणि सतीश काैशिक डायरेक्टर होते.

नुकताच मुलाखतीमध्ये महेश ठाकुरने सांगितले की, त्यावेळी सर्वजण श्रीदेवी यांना घाबरत. हेच नाही तर रोमांटिक सीन श्रीदेवी यांच्यासोबत करताना मी खूप जास्त घाबरत.

नेहमीच श्रीदेवी या माझ्यासाठी जीवंत असतील हे देखील महेश ठाकुरने म्हटले. श्रीदेवी यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.