3, 4, 5 तारखेला राज्यात धो धो पाऊस, IMD चा इशारा, ऐन..
राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानात मोठा बदल होत आहे. त्यातच हवामान विभागाने मोठा इशारा दिला. आज काही भागात पावसाचा मोठा इशारा देण्यात आला असून येलो अलर्ट जारी केला. पुढील तीन दिवस राज्यात पाऊस राहण्याची शक्यता आहे.

राज्यात हवामानात मोठा बदल झाला. एकीकडे पाऊल सुरू आहे तर दुसरीकडे सकाळच्यावेळी थंडीची चाहुलही जाणवत आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता आहे.
मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून 30 ते 40 ताशी वेगाने यादरम्यान वारे वाहण्याची शक्यता आहे.
नाशिक, नंदुरबार जिल्ह्यात वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात ऐन दिवाळीच्या तोंडावर धो धो पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला नसला तरीही आता चांगला पाऊस कोसळत आहे.
कोल्हापूरमध्ये पावसाचा मोठा अलर्ट जारी करण्यात आला. सोलापूरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊल होण्याची शक्यता आहे. पावसाचा येलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने दिला. विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.
मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यात आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. नांदेड, लातूरमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. पुढील तीन दिवस राज्यातील अनेक भागात पाऊस होईल.