AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Police Transfers : महाराष्ट्र पोलीस दलात मोठा फेरबदल; 15 IPS आणि RPS अधिकाऱ्यांची बदली, कोणाची कुठे नियुक्ती? वाचा यादी

महाराष्ट्र पोलीस दलात मोठा फेरबदल झाला आहे. राज्यातील 15 IPS आणि RPS अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. जाणून घ्या कोणाची कुठे बदली झाली, वाचा यादी

Police Transfers : महाराष्ट्र पोलीस दलात मोठा फेरबदल; 15 IPS आणि RPS अधिकाऱ्यांची बदली, कोणाची कुठे नियुक्ती? वाचा यादी
maharashtra police Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 03, 2026 | 12:32 PM
Share

महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल झाले आहेत.  महाराष्ट्रातील  आयपीएस आणि आरपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.  या बदल्यांचे आदेश गृह विभागाकडून जारी करण्यात आल्या आहेत. या आदेशात ठाणे पोलीस दलातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. गृह विभागाने अधिकाऱ्यांना दिलेल्या या मुदतवाढीकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.

महाराष्ट्रातील गृह विभागाने 2 नोव्हेंबर 2026 रोजी शासन आदेश जारी झाला. पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक एकच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आलाय. यात ठाणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त अमरसिंग जाधव आणि परमंडळ क्रमांक 5 चे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांच्यासह कोकण परिक्षेत्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे शिवराज पाटील यांना एक वर्षांची मुतवाढ देण्यात आलीय. एसआयटी प्रमुख अमरसिंह जाधव ,उपायुक्त प्रशांत कदम यांची प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणामुळे एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या मुदतवाढीमुळे संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीच्या पदावर आणखी एक वर्ष काम करण्याची संधी दिली आहे.

गृह विभागाच्या आदेशात अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांची बीडच्या अंबेजोगाईमध्ये बदली करण्यात आली आहे. ठाणे शहराच्या परिमंडळ क्रमांक 1 च्या पोलीस आयुक्त मिना मखवाना यांची ठाणे ग्रामीणच्या अपर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आलीये. तर जयंत बजबळे यांची पोलीस उपायुक्त , ठाणे शहरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एकीकडे राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं बदल्यांचे सत्र सुरू आहे. दुसरीकडे ठाण्यातील अधिकाऱ्यांना एक वर्षांची मुदतवाढ चर्चेचा विषय ठरत आहे.

अधिकाऱ्यांची कोणत्या पदावरून कुठे बदली? 

विकास संपत नाईक, पोलीस उप अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नागपूर  – अपर उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई

संकेत सतीश गोसावी, पोलीस उप अधीक्षक, गुअवि, पुणे – उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी उपविभाग, रत्नागिरी

कुमार भिकाजी चौधरी, उपविभागीय पोलीस अधिकारी, औसा उपविभाग, लातूर  – पोलीस उप अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक

सुधीर पुंडलिक नांदणवार,  प्रतीक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी, तुमसर उपविभाग, भंडारा

संतोष वैरागडे,  सहायक पोलीस आयुक्त, दहशतवाद विरोधी पथक – उपविभागीय पोलीस अधिकारी, मालेगाव कॅम्प उपविभाग, नाशिक

श्रीकांत चंद्रकांत कांकाळ, पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, बीड  – पोलीस उप अधीक्षक,अनुसूधचत जमाती प्रमाणपत्र पडताळणी सधमती, धकनिट, मुख्यालय छ.सांभाजीनगर

अनमोल मित्तल – अपर पोलीस अधीक्षक, ठाणे (ग्रामीण) – अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई, बीड

आकांक्षा यादव – उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी उपविभाग, रत्नागिरी – उपविभागीय पोलीस अधिकारी, औसा, लातूर

संदीप जाधव – प्रतीक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी, औसा, नांदेड

शिवराज पाटील – अपर पोलीस अधीक्षक, नांदेड एक वर्ष मुदतवाढ

अमरसिंग जाधव – पोलीस –  उप आयुक्त, गुन्हे शाखा, ठाणे शहर (एक वर्ष मुदतवाढ)

प्रशांत कदम – पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 5, ठाणे शहर (एक वर्ष मुदतवाढ )

मीना मखवाना–  अपर पोलीस अधीक्षक, ठाणे (ग्रामीण), – पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 1, ठाणे शहर

वैशाली ईश्वर कडुकर – अपर पोलीस अधीक्षक, सातारा – पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे

Follow Us
माझी हौस नव्हती, जालन्यातील महिलांसाठी रॅम्पवर उतरले; पंकजा मुंडेंचं..
Pankaja Munde : माझी हौस नव्हती, जालन्यातील महिलांसाठी रॅम्पवर उतरले... पंकजा मुंडेंचं टीकाकारांना सडेतोड उत्तर
गोकुळमध्ये महायुतीची नवी खेळी; चार शासकीय सदस्यांच्या नियुक्तीने...
Gokul : Mahayuti : गोकुळमध्ये महायुतीची नवी खेळी; चार शासकीय सदस्यांच्या नियुक्तीने सत्तासमीकरण बदलणार?
तुषार कपूरला बिश्नोई गँगच्या नावाने धमकीचा फोन? 5 कोटींची खंडणी....
Tusshar Kapoor : तुषार कपूरला बिश्नोई गँगच्या नावाने धमकीचा फोन? 5 कोटींची खंडणी मागितल्याचा दावा
गोकुळमध्ये मित्रपक्षांना डावलल्याचा आरोप; शासन नियुक्त सदस्य निवडीवरून
Mahayuti : गोकुळमध्ये मित्रपक्षांना डावलल्याचा आरोप; शासन नियुक्त सदस्य निवडीवरून महायुतीत नाराजीचा सूर
पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची नाराजी
NCP : निर्णय घेताना वरिष्ठांना विश्वासात घ्या...; पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची नाराजी
सांगली जिल्हा बँकेत गोपीचंद पडळकरांचा दणदणीत विजय
Sangli Bank Election Result : सांगली जिल्हा बँकेत गोपीचंद पडळकरांचा दणदणीत विजय; कार्यकर्त्यांचा जल्लोष
अवघ्या एका मताने फिरला निकाल; संजयकाका पाटील विजयी, सुमनताई पाटील....
District Bank Election Result 2026 : अवघ्या एका मताने फिरला निकाल; संजयकाका पाटील विजयी, सुमनताई पाटील पराभूत
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या सत्तेचा आज फैसला; 10 जागांसाठी मतमोजणी....
Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या सत्तेचा आज फैसला; 10 जागांसाठी मतमोजणी, कोण मारणार बाजी?
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शंभूराज देसाईंची बाजी, पाटणकरांना....
Satara District Bank Election Result : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शंभूराज देसाईंची बाजी, पाटणकरांना धक्का; कार्यकर्त्यांचा जल्लोष
हायकोर्टात राम पूर्णेकरांचे वकील महत्त्वाचे पुरावे सादर करणार....
Pradeep Purnekar : Ram Purnekar : हायकोर्टात राम पूर्णेकरांचे वकील महत्त्वाचे पुरावे सादर करणार; कोणते महत्त्वाचे मुद्दे समोर येणार?