AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Siddharth Chandekar: तुला थोडं मॅच्युअर व्हावं लागणार… सिद्धार्थ चांदेकरला बायको मिताली मयेकरचा सल्ला, नेमकं काय घडलं?

Siddharth Chandekar: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ चांदेकरला बायकोने दिलेल्या सल्लाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Siddharth Chandekar: तुला थोडं मॅच्युअर व्हावं लागणार... सिद्धार्थ चांदेकरला बायको मिताली मयेकरचा सल्ला, नेमकं काय घडलं?
Siddharth ChandekarImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 03, 2026 | 12:29 PM
Share

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीमधील एक नाव म्हणजे सिद्धार्थ चांदेकर. सिद्धार्थ चांदेकर हा कायमच चर्चेत असतो. कधी त्याच्या आगामी चित्रपटामुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. सिद्धार्थ हा सतत चाहत्यांची मने जिंकत असतो. सध्या सोशल मीडियावर सिद्धार्थ चांदेकरने शेअर केलेल्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता हा व्हिडीओ नेमका काय आहे पाहा…

सिद्धार्थ चांदेकरने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने पोपटी रंगाचा शर्ट परिधान केला आहे. तसेच त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये एक बालगीत वाजत असल्याचे ऐकू येत आहे. या व्हिडीओवर सिद्धार्थने ‘बायको म्हणाली की तुला आता तरी थोडं मॅच्युअर वागायवा हवं’ असे लिहिली आहे. त्यावर उत्तर देत सिद्धार्थने मी: (आणि बॅकग्राऊंडमध्ये वाजत असलेल्या गीत दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे) असे म्हटले आहे.

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

सध्या सोशल मीडियावर सिद्धार्थचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने हे गाणं जात नाहीय डोक्यातून! मी एकटा कशाला ऐकू? असे कॅप्शन दिले आहे. त्याच्या या मजेशीर व्हिडीओची सर्वत्र चर्चा सुरु आहे. एका यूजरने या व्हिडीओवर कमेंट करत, मी पण तुमच्या टीममध्ये आहे असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने अरे हे काय गाणे आहे? अशी कमेंट केली आहे. अनेक यूजर्सनी या व्हिडीओवर हसण्याचा इमोजी पोस्ट केला आहे.

सिद्धार्थ चांदेकरच्या कामाविषयी

सध्या सिद्धार्थ त्याचा आगामी सिनेमा झिम्मा 3च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट 1 जानेवारी 2027 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटात कोण कोण दिसणार याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, पहिले दोन भाग पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. यापूर्वी सिद्धार्थ अडकित्ता या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट झी 5वर प्रदर्शित झाला होता. सिद्धार्थची बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबतची मिसेस देशपांडे ही सीरिज विशेष चर्चेत होती. या सीरिजने सर्वांचे लक्ष वेधले होते. आता झिम्मा 3 सिनेमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
माझी हौस नव्हती, जालन्यातील महिलांसाठी रॅम्पवर उतरले; पंकजा मुंडेंचं..
Pankaja Munde : माझी हौस नव्हती, जालन्यातील महिलांसाठी रॅम्पवर उतरले... पंकजा मुंडेंचं टीकाकारांना सडेतोड उत्तर
गोकुळमध्ये महायुतीची नवी खेळी; चार शासकीय सदस्यांच्या नियुक्तीने...
Gokul : Mahayuti : गोकुळमध्ये महायुतीची नवी खेळी; चार शासकीय सदस्यांच्या नियुक्तीने सत्तासमीकरण बदलणार?
तुषार कपूरला बिश्नोई गँगच्या नावाने धमकीचा फोन? 5 कोटींची खंडणी....
Tusshar Kapoor : तुषार कपूरला बिश्नोई गँगच्या नावाने धमकीचा फोन? 5 कोटींची खंडणी मागितल्याचा दावा
गोकुळमध्ये मित्रपक्षांना डावलल्याचा आरोप; शासन नियुक्त सदस्य निवडीवरून
Mahayuti : गोकुळमध्ये मित्रपक्षांना डावलल्याचा आरोप; शासन नियुक्त सदस्य निवडीवरून महायुतीत नाराजीचा सूर
पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची नाराजी
NCP : निर्णय घेताना वरिष्ठांना विश्वासात घ्या...; पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची नाराजी
सांगली जिल्हा बँकेत गोपीचंद पडळकरांचा दणदणीत विजय
Sangli Bank Election Result : सांगली जिल्हा बँकेत गोपीचंद पडळकरांचा दणदणीत विजय; कार्यकर्त्यांचा जल्लोष
अवघ्या एका मताने फिरला निकाल; संजयकाका पाटील विजयी, सुमनताई पाटील....
District Bank Election Result 2026 : अवघ्या एका मताने फिरला निकाल; संजयकाका पाटील विजयी, सुमनताई पाटील पराभूत
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या सत्तेचा आज फैसला; 10 जागांसाठी मतमोजणी....
Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या सत्तेचा आज फैसला; 10 जागांसाठी मतमोजणी, कोण मारणार बाजी?
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शंभूराज देसाईंची बाजी, पाटणकरांना....
Satara District Bank Election Result : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शंभूराज देसाईंची बाजी, पाटणकरांना धक्का; कार्यकर्त्यांचा जल्लोष
हायकोर्टात राम पूर्णेकरांचे वकील महत्त्वाचे पुरावे सादर करणार....
Pradeep Purnekar : Ram Purnekar : हायकोर्टात राम पूर्णेकरांचे वकील महत्त्वाचे पुरावे सादर करणार; कोणते महत्त्वाचे मुद्दे समोर येणार?