AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिया मिर्झा मुस्लिम आहे म्हणून… संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; भाजपला थेट सवाल काय?

अभिनेत्री दिया मिर्झाच्या फटाकेबंदी आवाहनवरून भाजपने तिला हिंदुत्वविरोधी ठरवले. यावर संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. राऊत म्हणाले की, दिया मिर्झाचा उद्देश पर्यावरणाचा होता, ती देशद्रोही नाही. मुस्लिम असल्याने तिला लक्ष्य करणे चुकीचे आहे. त्यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, देशद्रोही कोण हे ठरवण्याचा अधिकार भाजपला नसल्याचे ठणकावले.

दिया मिर्झा मुस्लिम आहे म्हणून... संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; भाजपला थेट सवाल काय?
Dia MirzaImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 03, 2026 | 12:16 PM
Share

अभिनेत्री दिया मिर्झा हिने दिवाळीत फटाके न फोडण्याचं आवाहन केलं आहे. त्यावरून भाजपने दिया मिर्झाला टार्गेट केलं आहे. दिवाळी कशी साजरी करायची? हे सांगणारी दिया मिर्झा कोण? असा सवाल करतानाच दिया मिर्झा हिंदुत्वाविरोधात आहे, असा आरोप भाजपने केला आहे. दिया मिर्झाला महापालिकेत ब्लॅक लिस्ट करण्यात आल्याची घोषणाही मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केली होती. या सर्व प्रकरणावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दिया मिर्झाचा गुन्हा काय आहे? त्या हिंदू विरोधी आहे असं वाटत नाही. देशद्रोही कोण आहे हे ठरवण्याचा अधिकार भाजपला नाही. भाजपची अनेक कृत्य देशाच्या विरोधात आहेत. ज्ञानेश कुमारला पाठिशी घालणं हा देशद्रोह आहे. ज्ञानेश कुमारसाठी पदयात्रा केल्या जात आहेत. दियाचा अपराध सांगा मला? काय गुन्हा आहे तिचा?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

मतभेद असू शकतात, पण…

काय म्हणाली दिया मिर्झा? फटाके उडवू नका, असं तिने सांगितलं. हे आम्हीच म्हणत नाही, या देशात त्यावर एकमत आहे. देशाचं प्रदूषण आणि पर्यावरण यावर तिचं मत आहे. तिचं मत देशद्रोही कसं असू शकतं? त्यावर मतभेद असू शकतात. फटाक्यांचा त्रास होतो की नाही हे पाहावं लागेल. पण फटाके नको असं म्हणणारी अभिनेत्री मुस्लिम आहे म्हणून तिला देशद्रोही ठरवणं हे चुकीचं आहे, असं संजय राऊत म्हणाले.

दिवाळीनंतर सवाल करणार

यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपवरही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करत आहेत. आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत. 500 कोटी रुपये आले कुठून? एकनाथ शिंदेंच्या मुलाच्या हाती पैसे कुणी दिले? त्या पैशाचं काय झालं? हे आम्ही विचारतच राहणार. आम्ही आठ दिवस वाट पाहतोय. दिवाळी नंतर आम्ही हे प्रश्न विचारणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.

ठाणे स्वतंत्र देश आहे का?

ठाण्यातील काही पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ठाण्यात वर्षानुवर्ष अधिकारी जागेवर आहेत. ठाण्याच्या बाहेर काही लोकांना जाऊ दिलं जात नाही. पोलीस आयुक्तांपासून अनेक अधिकारी एकाच जागी आहेत. ठाणे स्वतंत्र देश आहे का? की केंद्रशासित प्रदेश आहे? ठाण्यावर लेफ्टनंट गव्हर्नर नेमला आहे का? जोपर्यंत बदल्या होत नाही तोपर्यंत ठाण्याची कायदा आणि सुव्यवस्था ठिकाणावर येणार नाही. मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे पोलिसांचे जावई आहेत का? की शिंदेंचे जावई आहेत? त्यांना अटक का केली जात नाही? असा सवाल त्यांनी केला.

Follow Us
गोकुळमध्ये महायुतीची नवी खेळी; चार शासकीय सदस्यांच्या नियुक्तीने...
Gokul : Mahayuti : गोकुळमध्ये महायुतीची नवी खेळी; चार शासकीय सदस्यांच्या नियुक्तीने सत्तासमीकरण बदलणार?
तुषार कपूरला बिश्नोई गँगच्या नावाने धमकीचा फोन? 5 कोटींची खंडणी....
Tusshar Kapoor : तुषार कपूरला बिश्नोई गँगच्या नावाने धमकीचा फोन? 5 कोटींची खंडणी मागितल्याचा दावा
गोकुळमध्ये मित्रपक्षांना डावलल्याचा आरोप; शासन नियुक्त सदस्य निवडीवरून
Mahayuti : गोकुळमध्ये मित्रपक्षांना डावलल्याचा आरोप; शासन नियुक्त सदस्य निवडीवरून महायुतीत नाराजीचा सूर
पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची नाराजी
NCP : निर्णय घेताना वरिष्ठांना विश्वासात घ्या...; पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची नाराजी
सांगली जिल्हा बँकेत गोपीचंद पडळकरांचा दणदणीत विजय
Sangli Bank Election Result : सांगली जिल्हा बँकेत गोपीचंद पडळकरांचा दणदणीत विजय; कार्यकर्त्यांचा जल्लोष
अवघ्या एका मताने फिरला निकाल; संजयकाका पाटील विजयी, सुमनताई पाटील....
District Bank Election Result 2026 : अवघ्या एका मताने फिरला निकाल; संजयकाका पाटील विजयी, सुमनताई पाटील पराभूत
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या सत्तेचा आज फैसला; 10 जागांसाठी मतमोजणी....
Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या सत्तेचा आज फैसला; 10 जागांसाठी मतमोजणी, कोण मारणार बाजी?
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शंभूराज देसाईंची बाजी, पाटणकरांना....
Satara District Bank Election Result : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शंभूराज देसाईंची बाजी, पाटणकरांना धक्का; कार्यकर्त्यांचा जल्लोष
हायकोर्टात राम पूर्णेकरांचे वकील महत्त्वाचे पुरावे सादर करणार....
Pradeep Purnekar : Ram Purnekar : हायकोर्टात राम पूर्णेकरांचे वकील महत्त्वाचे पुरावे सादर करणार; कोणते महत्त्वाचे मुद्दे समोर येणार?
सांगली जिल्हा बँकेच्या 6 जागांसाठी आज निकाल; कोण मारणार बाजी?
Sangli Bank Election Result : सांगली जिल्हा बँकेच्या 6 जागांसाठी आज निकाल; कोण मारणार बाजी?