
इंडिया आऊट अभियान चालवणाऱ्या मोहम्मद मुइज्जू यांनी मालदीवच्या मदतीसाठी तिथे तैनात असलेल्या भारतीय सैनिकांना परत पाठवलं. याची मोठी किंमत चुकवावी लागली. अवघ्या 8 महिन्यात त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली.

मालदीव सरकारचा प्रचार विभाग भारतात येऊन भारतीयांना पर्यटनासाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न करतोय. मालदीव मार्केटिंग एंड पब्लिक रिलेशन्स कॉर्पोरेशन भारताच्या तीन शहरात वेलकम इंडिया नावाने रोड शो काढणार आहे.

मालदीवचे पर्यटन मंत्री इब्राहिम फैसल भारतात दाखल झालेत. त्यांनी मंगळवारी भारताचे पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची भेट घेतली. मालदीवमध्ये भारतीय पर्यटकांनी संख्या रोडावत चाललीय. त्यावेळी हा रोड शो होतोय.

मालदीवची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात पर्यटनावर अवलंबून आहे. मागच्यावर्षीच्या पहिल्या चार महिन्यांच्या तुलनेत चालू वर्षाच्या पहिल्या चार महिन्यात मालदीवला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या 42 टक्क्याने कमी झाली आहे. पर्यटनावर आधारित मालदीवसाठी हा मोठा झटका आहे.

मालदीवच मीडिया पोर्टल अधाधूच्या रिपोर्ट्नुसार, नवी दिल्ली, मुंबई आणि बंगळुरुमध्ये रोड शो पाच दिवस चालणार आहे. रोड शो मध्ये मालदीवचे बीच, रिसॉर्ट, गेस्ट हाऊस आणि सांस्कृतिक इतिहासाचा प्रचार करण्यात येईल. मालदीवच्या व्यापारिक प्रतिष्ठानने हा रोड शो स्पॉन्सर केलाय.