मराठ्यांसह सगळ्या जातींनी…धनंजय मुंडे यांच्या त्या विधानावर मनोज जरांगे संतापले; केली सडकून टीका!

त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी राजकीय संन्यासावर भाष्य केल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, मुंडे यांच्या याच विधाानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

| Updated on: Aug 03, 2026 | 6:53 PM
1 / 5
अजित पवार यांच्या पक्षाचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सध्याचे राजकारण खूपच गलिच्छ झाले आहे. जातीपातीचे, धर्माचे राजकारण केले जात आहे, अशी खंत व्यक्त केली. तसेच सध्याचे राजकारण पाहून मला राजकारणात राहावं की नाही, असा प्रश्न पडतो, असं विधान केलं.

2 / 5
त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी राजकीय संन्यासावर भाष्य केल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, मुंडे यांच्या याच विधाानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी राजकीय संन्यासावर भाष्य केल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, मुंडे यांच्या याच विधाानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

3 / 5
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी मुंडे यांच्यावर सडकून टीका केली. जेव्हा काळ होता तेव्हा नीट खाता आलं नाही. मराठ्यांसह सगळ्या जातींनी त्यांना मोठं केलं. त्यांच्या टोळीने ओरबाडून खाल्लं, असा हल्लाबोल जरांगे यांनी केला.

4 / 5
तसेच, धनंजय मुंडे यांनी ना ओबीसी मोठा होऊ दिला ना मराठा मोठा होऊ दिला. त्यांनी मारामारीतच वेळ जास्त घातला, असंही ते म्हणाले, तु शहाणा हो मराठ्यांच्या नादी लागू नको, असा रोखठोक इशाराही त्यांनी मुंडे यांना दिला.

5 / 5
कोणताही पक्ष, कोणीही तुम्हाला जवळ करणार नाहीत. आता मध्ये जायची वेळ आली आहे, असा हल्लाबोलही मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला. आता धनंजय मुंडे मनोज जरांगे यांना काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us