AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asian Games : पहिल्या हाफमध्ये पिछाडी, दुसऱ्या हाफमध्ये भारतीय वाघांचा धडाका; इराणला 40-34 ने हरवत जिंकलं सुवर्ण

टीम इंडियाच्या कबड्डी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं आहे. या सगल्या स्पर्धेत सुरुवातीपासून 2026 पर्यंत केवळ एकदाच टीमने सुवर्णपदक गमावलं होतं. यंदा महिला आणि पुरुष हे दोन्ही संघ सुवर्णपदक जिंकण्यात यशस्वी ठरले आहेत.

Asian Games : पहिल्या हाफमध्ये पिछाडी, दुसऱ्या हाफमध्ये भारतीय वाघांचा धडाका; इराणला 40-34 ने हरवत जिंकलं सुवर्ण
IND KabaddiImage Credit source: social media
| Updated on: Sep 26, 2026 | 5:39 PM
Share

भारताच्या पुरुष कबड्डी संघानेही आता आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. फायनल सामना इराणविरुद्ध सुरु होता. यावेळी टीम इंडियाने इराणला 40-34 स्कोरने मात दिली आहे. हा सामना अतिशय रोमांचक झाला होता. पहिल्या हॉफच्या वेळी टीम इंडिया 17-18 च्या स्कोरने मागे होती. परंतू दुसऱ्या हॉफमध्ये टीम इंडियाने चांगलंच कमबॅक केलं. यावेळी 30-24 स्कोर झाला होता. शेवटी टीम इंडियाने 30-40 च्या स्कोरने भारतीय वाघांनी सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

दरम्यान, यावेळी 2023 मधल्या फायनलसारखा कोणताही ड्रामा झाला नाही. भारताने एकतर्फी स्कोर केला आणि विजय सोपा केला आणि मेडल देशाच्या नावावर केलं. इराणनेही नेहमीप्रमाणे त्यांचा खेळ पूर्ण ताकदीने केला. पण त्यांना काही यश मिळाले नाही. शेवटी टीम इंडिया त्यांच्यावर भारी पडली.

दुसऱ्या हॉफमध्ये टीम इंडियाची कमाल

दरम्यान, सर्वात मोठ टर्निंग पॉईंट ठरला दुसरा हॉफ. पहिल्या हॉफमध्ये टीम इंडिया मागे पडली होती. 17-18 स्कोरने मागे पडणारी टीम इंडिया दुसऱ्या हॉफमध्ये मात्र पूर्णपणे जोशात दिसली. भारताने सातत्याने स्कोर वाढवला. त्यानंतर इराणच्या संघानेही सामन्यामध्ये परतण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला पण भारताला मात देऊ शकला नाही. भारतीय टीमने दुसऱ्या हॉफमध्ये रेडद्वारे 18 चा आकडा गाठला. तर इराणला ऑल आऊट करत दोन अंक मिळवले.

दरम्यान, भारताच्या पुरुष संघाने 1990 पासून आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला आहे. तेव्हापासून संघाने आतापर्यंत 9 सुवर्णपदक जिंकले आहेत. या स्पर्धेमध्ये भारताशिवाय इराण हा एकमेव देश आहे ज्याने सुवर्णपदक जिंकलं आहे. इराणचा संघाने 2018 मध्ये सुवर्ण जिंकललं तर भारताला तेव्हा कांस्य पदकावरच समाधान मानावं लागलेलं.

दरम्यान, उपांत्य फेरीत भारताने थायलंडचा 66-28 अशा मोठ्या फरकाने पराभव केला. भारताने सुरुवातीला बांगलादेशवर 42-21 असा विजय मिळवून केली आणि त्यानंतर इराणविरुद्ध 37-23 असा विजय नोंदवला. आपल्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने यजमान जपानवर 50-25 असा दणदणीत विजय मिळवला.

Follow Us
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार