
कोमट पाण्याने ओवा घेतल्यास गॅस, बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटी यासारख्या पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो. ओवामध्ये असलेले थायमॉल नावाचे घटक पाचक एंझाइम सक्रिय करतात, ज्यामुळे पचनसंस्था चांगले काम करते. त्यामुळे पोटातील गॅस बाहेर निघतो आणि अपचन होत नाही.

ओवाचे सेवन केल्याने चयापचय गतिमान होते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. कोमट पाण्यासोबत याचे सेवन केल्याने शरीरातील चरबी कमी होते.

रात्री कोमट पाण्यासोबत ओवा घेतल्याने शरीराला आराम मिळतो. चांगली झोप येते. ओवीमध्ये असलेले आयुर्वेदिक गुणधर्म शरीराला शांत करतात आणि मानसिक तणाव कमी करतात. ज्यामुळे गाढ आणि आरामदायी झोप लागते.

ओवामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ओवाचे नियमित सेवन केल्याने शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढते. तसेच सर्दी-खोकल्यासारख्या सामान्य आजारांपासून संरक्षण मिळते.

ओवाच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित राहतो. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. यामध्ये आढळणारे मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हृदयाचे कार्य चांगले करते. शरीरात रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता कमी होते.