चित्रपटांत बिकिनी घालायला नकार दिला म्हणून ओरडलेले मराठी अभिनेत्रीचे बाबा, सांगितलेलं, बिनधास्त घाल…

Neha Garde : नेहा गर्दे नुकतीच ऑस्ट्रेलियातून भारतात परतली आहे, तिने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली आहे ज्यात तिने एक किस्सा शेअर केला आहे.

| Updated on: Nov 29, 2026 | 12:58 PM
1 / 5
अभिनेत्री आहे नेहा गद्रे सध्या चर्चेत आहे कारण ती नुकतीच ऑस्ट्रेलियावरुन परतली आहे. तब्बल सहा वर्षानंतर ती भारतात परतली आहे.  तिने नुकतीच एक मुलाखत दिली ज्यात तिने तिच्या वडिलांबद्दलचा एक किस्सा बोलू दाखवला आहे.

अभिनेत्री आहे नेहा गद्रे सध्या चर्चेत आहे कारण ती नुकतीच ऑस्ट्रेलियावरुन परतली आहे. तब्बल सहा वर्षानंतर ती भारतात परतली आहे. तिने नुकतीच एक मुलाखत दिली ज्यात तिने तिच्या वडिलांबद्दलचा एक किस्सा बोलू दाखवला आहे.

2 / 5

नेहा म्हणाली की" माझे बाबा स्ट्रॉँग आहेत, माझ्याकडे प्रोजेक्ट आले होते की मला त्यात बिकिनी घालायची होती. मी तेव्हा स्पष्टपणे नकार दिला, यानंतर मी माझ्या बाबांशी याविषयी चर्चाही केली होती."

3 / 5

"मी माझ्या बाबांना सांगितले की, मला ते कम्फर्टेबल वाटलं नाही म्हणून मी नाही म्हटलं, पण तेव्हा माझे बाबा उलट मलाच ओरडले, माझ्यासाठी ही गोष्ट खूप शॉकिंग होती, मला माहित आहे की माझे बाबा विचारांनी खूप प्रगत आहे, पण इतके प्रगत आहे हे मला आता समजलं." असं अभिनेत्री नेहा गर्दे म्हणाली.

4 / 5

माझे बाबा मला म्हणाले की," जर तू हे असंच घालून गेली असती तर वडिल मी कदाचित तुझ्यावर रागावलो असतो, पण जर तु ते कामासाठी घालत आहे तर काहीच हरकत नाही, तुझं फिल्ड आहे ते, तुझं तुला माहित आहे ना काय करायचं आणि काय नाही ते मग झालं" असं नेहाने बोलून दाखवलं.

5 / 5

प्रोफेशनललिझममध्ये मी ही गोष्ट आणल्यामुळे ते तेव्हा माझ्यावर प्रचंड रागावले होते असं नेहानं बोलून दाखवले. दरम्यान नेहाने मोकळा श्वास, गडबड झाली या चित्रपटांत काम केले आहे. स्टार प्रवाहावरील मन उधाण वाराचे या मालिकेतून ती घरोघरी पोहोचली. यानंतर तिने झी मराठीवरील अजूनही चांद रात आहे या मालिकेतही काम केले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us