मराठमोळ्या अभिनेत्रीच्या वेब सीरिजची 10 वर्षांनंतरही क्रेझ कायम, 4 सिझन्सला भरभरून प्रेम

साध्या गोष्टींमधील आनंद, नात्यांमधील समजूतदारपणा आणि एकमेकांसोबत घालवलेले क्षण यांचं महत्त्व या सीरिजने अधोरेखित केलं. दहा वर्षांनंतरही प्रेक्षक या सीरिजची आठवण काढत आहेत, हीच तिच्या लोकप्रियतेची खरी पावती आहे.

| Updated on: Oct 26, 2026 | 1:07 PM
1 / 7
मनोरंजनविश्वात अनेक प्रेमकथा येतात आणि काळानुसार विस्मरणातही जातात. मात्र, काही कथा प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करतात. अभिनेत्री मिथिला पालकर आणि अभिनेता ध्रुव सहगल यांची लोकप्रिय वेब सीरिज ‘लिटिल थिंग्स’ ही त्यापैकीच एक. या रोमँटिक कॉमेडी सीरिजला 25 ऑक्टोबर 2026 रोजी दहा वर्षे पूर्ण झाली.

मनोरंजनविश्वात अनेक प्रेमकथा येतात आणि काळानुसार विस्मरणातही जातात. मात्र, काही कथा प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करतात. अभिनेत्री मिथिला पालकर आणि अभिनेता ध्रुव सहगल यांची लोकप्रिय वेब सीरिज ‘लिटिल थिंग्स’ ही त्यापैकीच एक. या रोमँटिक कॉमेडी सीरिजला 25 ऑक्टोबर 2026 रोजी दहा वर्षे पूर्ण झाली.

2 / 7

या खास निमित्ताने मिथिलाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. विशेष म्हणजे, दशक उलटूनही या सीरिजवर प्रेक्षकांचं प्रेम कायम असल्याने अभिनेत्रीने आनंद व्यक्त केला आहे. मिथिला पालकरने सोशल मीडियावर ‘लिटिल थिंग्स’च्या दहा वर्षांच्या प्रवासाबद्दल भावना व्यक्त केल्या.

3 / 7

दहा वर्षांपूर्वी याच दिवशी सीरिजचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. आजही या सीरिजला प्रेक्षकांकडून प्रेम मिळत असल्याने आपण भाग्यवान असल्याचं तिने म्हटलं. मिथिलाने या सीरिजचं वर्णन ‘कधीही न संपणारं गिफ्ट’ अशा शब्दांत केलं. तसेच प्रेक्षकांना या सीरिजमधील त्यांचा आवडता भाग किंवा सिझन कोणता, असा प्रश्नही तिने विचारला.

4 / 7

‘लिटिल थिंग्स’मध्ये मिथिला पालकरने काव्या कुलकर्णी, तर ध्रुव सहगलने ध्रुव वत्स ही व्यक्तिरेखा साकारली होती. मुंबईत एकत्र राहणाऱ्या या जोडप्याच्या आयुष्यातील छोट्या-मोठ्या घटना, प्रेम, भांडणं, करिअर आणि नात्यात होणारे बदल या सीरिजमधून दाखवण्यात आले.

5 / 7

या सीरिजचं वैशिष्ट्य म्हणजे यात प्रेमाचं अतिशय साधं आणि वास्तववादी चित्रण करण्यात आलं. मोठे नाट्यमय प्रसंग किंवा अवास्तव वळणं यांपेक्षा रोजच्या आयुष्यातील छोट्या गोष्टींना महत्त्व देण्यात आलं. त्यामुळे अनेक तरुणांना काव्या आणि ध्रुवच्या व्यक्तिरेखांमध्ये स्वतःचं प्रतिबिंब दिसलं.

6 / 7

ध्रुव सहगलनेही मिथिलाच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत या सीरिजचा भाग होता आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्याच्या मते, ही सीरिज प्रेम आणि मैत्रीतून साकारलेली होती. अभिनेत्री महिमा मकवाना हिनेदेखील या मालिकेचं कौतुक केलं.

7 / 7

‘लिटिल थिंग्स’चा पहिला सीझन 25 ऑक्टोबर 2016 रोजी Dice Media या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाला होता. सुरुवातीला डिजिटल माध्यमावर आलेल्या या सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर नेटफ्लिक्सने ही सीरिज आपल्या प्लॅटफॉर्मवर आणली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us