6-6 महिने पीरियड्स येत नव्हते, रात्री मी… ‘आप्पी आमची कलेक्टर’मधील अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
अभिनेत्री म्हटलं की चेहऱ्यावर सतत मेकअप, वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंग करणं, हेकटिक शेड्यूल या सर्व गोष्टी आल्याच. पण एका अभिनेत्रीला या सगळ्यामुळे खूप त्रास सहन करावा लागला होता.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे आप्पी आमची कलेक्टर. या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी नाईक. अगदी कमी वेळात ही मालिका प्रेक्षकांना आपलीशी वाटू लागली होती. पण या मालिकेत काम करणारी अभिनेत्री शिवानीला खासगी आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.
नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत शिवानीने चेहऱ्यावर येणारे पिंपल्स आणि त्यामुळे ट्रोल करणाऱ्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. पण त्या पिम्पल्सच्या मागे शिवानीला खूप त्रास सहन करावा लागला होता.
मुलाखतीत बोलताना शिवानी म्हणाली की, आप्पी मला मिळाली तेव्हा मी अवघी 22-23 वर्षांची होते. तो काळच तसा असतो. ज्यात तुमच्या शरीरात अनेक बदल घडत असतात. माझ्या ताईलाही त्या वयात प्रोब्लेम होता. पण तो प्रोब्लेम नेमका तेव्हाच सुरू झाला जेव्हा मी स्क्रीनवर दिसले.
पुढे ती म्हणाली, शूटमध्ये तुम्ही कितीही प्लानिंग करा ते शूट हेक्टिक होतंच. माझं शूट हेक्टिक होत गेलं. लीड म्हटल्यावर ते होतंच. प्रत्येक शूटला वेगळं दिसणं, वेगळ्या इव्हेंट्स जाणं, तिथे प्रेझेंट होणे या सर्व अपेक्षा असतात. ते सगळं अक्षरश: चेहऱ्यावर दिसायला लागलं होतं. मग पिम्पल्स येणं, पीरियड्स सायकल मिस होत होती, PCOS सुरू झाले.
शेवटी शिवानी म्हणाली, तेव्हा मला सहा सहा महिने पीरियड्स येत नव्हते. तीन महिने पीरियड्स येत नव्हते. त्यामुळे ती सगळी उष्णता चेहऱ्याद्वारे बाहेर येत होती.