Tejashri Pradhan: कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे… तेजश्री प्रधान असं का म्हणाली होती? विधान पुन्हा चर्चेत
Tejashri Pradhan: मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधान विषयी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. सध्या तिच्या जुन्या विधानाची चर्चा सुरु आहे.

मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधान ही कायमच चर्चेत असते. कधी तिच्या कामामुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे तेजश्री प्रधान चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तेजश्रीने एका मुलाखतीत केलेल्या विधानाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
तेजश्री प्रधानने काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीमध्ये कुठे बोलावं आणि कुठे बोलू नये याबाबत वक्तव्य केले होते. तिचे हे विधान आता पुन्हा चर्चेत आले आहे. चाहत्यांनी तिच्या या विधानाला सकारात्मकेशी जोडले आहे.
तेजश्री प्रधानने एका मुलाखतीत सांगितले की, आपला श्रोता कसा आहे त्यावर अनेक गोष्टी असतात. काही वेळा दादा म्हणाला तसं जिथे तुझे शब्द बोलून वाया जाणार आहेत हे आपल्याला माहिती असतं आणि मुळात ते आपल्याला आधी कळावं लागतं. त्यामुळे अशा ठिकाणी बोलूच नये.
पुढे ती म्हणाली की, आणि हो मी तशी रोकठोक आहे. मला वाटतं तिथे मी बोलते. पण कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. जर आपले शब्द आपल्यावरच पुन्हा बाऊंस होणार असतील तर तिथे थांबलेलं बरं असतं.
तेजश्री प्रधान ही सध्या वीण दोघातले तुटेना या मालिकेत दिसत आहेत. तिने या मालिकेत स्वानंदीची भूमिका साकारली आहे. ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे.