
अलीकडेच पिंकविलाशी बोलताना निक्की तांबोळीने खुलासा केला की, सेलिब्रिटी मास्टरशेफ संपल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल व्हावं लागलं.

निक्कीने सांगितलं की, डिनरसाठी बाहेर गेल्यानंतर तिला लगेच ICU मध्ये दाखल करावं लागलं. तिची तब्येत खूपच बिघडलेली.

निक्कीने पिंकविलाला सांगितलं की, "मी माझ्या मित्र-मैत्रिणींसोबत हॉटेलमध्ये डिनरसाठी गेली होती. मला माहित नव्हतं की, मला शेलफिशची एलर्जी आहे"

त्या दिवशी मी 4 मोठे शेलफिश खाल्ले. त्यानंतर मला रिएक्शन झालं. माझी फुफ्फुस सुजली. माझे डोळे सूजले होते. त्यावेळी माझा श्वास जवळपास बंद झाला होता. त्यानंतर मला रुग्णालयात नेण्यात आलं. इमर्जन्सी होती. म्हणून मला व्हीलचेअरवरुन ICU मध्ये नेण्यात आलं.

दोन दिवस मी तिथे होती. सूज कमी करण्यासाठी डॉक्टरांनी मला हेवी डोस दिला. त्यानंतर मला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.