Cheapest Car Price : फक्त 3.70 लाखांची कार, खरेदी करण्यासाठी लोकांची मोठी झुंबड, वाचा फिचर्स काय?
ही एक हॅचबॅच कार आहे. या कारची विक्री चांगलीच वाढल्याचा दावा केला जातोय. ही कार मारुती कंपनीची असून तिचे नाव अल्टो के10 असे आहे. ही मारुतीची बेस्ट सेलिंग कार असल्याचे बोलले जाते.

लोकांना कार चालवायला खूप आवडते. आपल्या घरी एक कार असावी. कारमध्ये संपूर्ण कुटुंबाला दूर फिरायला घेऊन जावे, असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. कार खरेदी करताना परवडणारी कार कोणती, याचा नेहमी शोध सुरू असतो.
दरम्यान, सध्या 3.70 लाखाच्या एका कारची सगळीकडे चर्चा आहे. ही कार लोकांच्या पसंतीस पडलेली आहे. ही कार नेमकी कशी आहे? या कारचे फिचर्स काय आहेत, ते जाणून घेऊ या...
ही एक हॅचबॅच कार आहे. या कारची विक्री चांगलीच वाढल्याचा दावा केला जातोय. ही कार मारुती कंपनीची असून तिचे नाव अल्टो के10 असे आहे. ही मारुतीची बेस्ट सेलिंग कार असल्याचे बोलले जाते.
मारुतीची आणखी एक कार आहे. या कारचे नाव मारुती सुझुकी अल्टो के10 हीदेखील अशीच प्रसिद्ध कार आहे. या कारच्या विक्रीतही चांगलीच वाढ झालीय. मारुती अल्टो कारच्या विक्रीतही 86 टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगितले जाते.
मारुतीची अल्टो के10 ही सर्वाधिक स्वस्त कारपैकी एक कार असल्याचे बोलले जाते. या कारची किंमत 3.70 लाख रुपये असल्याचे बोलले जाते. या कारच्या पेट्रोल व्हेरियंटचे अॅव्हरेज 24 किमी प्रतिलिटर आहे. तर सीएनजी व्हर्जन गाडीचे अॅव्हरेज 33 किमी प्रतिकिलो आहे.