न रात्र होते,ना अंधार पडतो अशी जागा जेथे ४ महिने सूर्यच मावळत नाही, मग कसे झोपतात लोक ?

पृथ्वी सुर्याभोवती फिरताना स्वत:च्या अक्षा भोवतीही फिरत असते.यामुळे पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवात काही देशात उन्हाळ्याच्या काही दिवसात सूर्य 24 तास मावळत नाही आणि सतत आकाशातच दिसत राहातो. या घटनेला 'मध्यरात्रीचा सूर्य' म्हणतात.कुठे घडते ही आश्चर्यकारक घटना आणि तेथील लोक झोपतात कसे ? पाहूयात...

| Updated on: Jul 13, 2025 | 8:16 PM
1 / 6
जग वेगवेगळ्या रहस्यांनी भरलेले आहे. एकाच वेळी कुठे रात्र असते तर कुठे दिवस असतो. भारतात जेव्हा दिवस असतो, तेव्हा अमेरिकेत रात्र असते. पृथ्वीच्या प्रदक्षिणेमुळे असे घडते.

2 / 6
परंतू तुम्हाला अशी जागा माहीती आहे जेथे चार महिने रात्रच होत नाही. सुर्य क्षितीजावरुन मावळतच नाही. येथे दिवसभर सुर्य तळपत असतो.यामुळे यास Land of Midnight Sun असेही म्हटले जाते.

3 / 6
पृथ्वीवरील हि जागा आहे नॉर्वेचा स्वालबार्ड (Svalbard)हा प्रांत. येथे जवळपास ४ महिने सुर्य मावळतच नाही. दिवस असो वा रात्र उजेडच असतो. ही अनोखी घटना नॉर्वेतील  या देशात २० एप्रिल ते २२ ऑगस्टपर्यंत असते.

4 / 6
 जर तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत येथे गेला तर सुर्य मावळताना तुम्हाला दिसणारच नाही. या नैसर्गिक चमत्काराला लोक खूप एन्जॉय करतात. अनेक जण यास सणासारखा उत्सव करतात. काही तर दूर देशातून हा नजारा पाहण्यासाठी खास येथे येतात.

5 / 6
आता तुमच्या मनात सवाल आला असेल की रात्रीचा अंधारच जर होत नाही तर लोक झोपतात कसे ? यासाठी या देशात ब्लॅकआऊट पडद्यांचा वापर करतात.  आणि झोपी जातात.

6 / 6
अशा ब्लॅक पडद्याने कृत्रिमपणे अंधार करुन लोक झोपतात. तर काही लोक डोळ्यांवर विमानात लावतात तशी मास्क पट्टी लावून झोपतात.आईसलँड, फिनलंड, स्वीडन आणि रशियाच्या काही भागांत मध्यरात्रीच्या सूर्याचा अनुभव घेता येतो. पण नॉर्वे हा त्याच्यासाठी अधिक प्रसिद्ध आहे.