Happy Birthday Sushmita Sen : जगावेगळी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन!; रिल आणि रिअल लाईफमुळे चर्चेत

सुष्मितानं वयाच्या 25 व्या वर्षी 2000मध्ये रिनेला आणि 2010मध्ये अलिशाला दत्तक घेतलं होतं.(Miss Universe Sushmita Sen ; her amazing reel and real life)

VN | Updated on: Nov 19, 2020 | 12:06 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आज तिचा 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. सुष्मिताचा जन्म हैदराबादमध्ये झाला. तिचे वडील भारतीय हवाई दलात विंग कमांडर होते. तर आई दुबईमध्ये ज्वेलरी डिझायनर होती.

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आज तिचा 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. सुष्मिताचा जन्म हैदराबादमध्ये झाला. तिचे वडील भारतीय हवाई दलात विंग कमांडर होते. तर आई दुबईमध्ये ज्वेलरी डिझायनर होती.

2 / 5

सुष्मितानं तिच्या कसदार अभिनयानं सगळ्यांची मनं तर जिंकलीच मात्र ती वैयक्तिक आयुष्यातही खूप चर्चेत राहिली. तिने लग्नापूर्वीच दोन मुलींना दत्तक घेऊन आगळंवेगळं उदाहरण निर्माण केलं. रिने आणि अलिशा असं या दोघींचं नाव आहे. एवढंच नाही तर सुष्मितानं रिनेला दत्तक घेतल्याची बाब सांगितली आहे.

3 / 5

तिनं वयाच्या 25 व्या वर्षी 2000मध्ये रिनेला आणि 2010मध्ये अलिशाला दत्तक घेतलं होतं.

4 / 5

वयाचं 18 वं वर्ष गाठल्यानंतर तुला न्यायालयामार्फत तुझ्या खऱ्या आईवडिलांची माहिती दिली जाईल, असं सुष्मितानं रिनेला तिच्या 16 व्या वाढदिवसाला सांगितलं होतं.

5 / 5

सुष्मिता सध्या बॉयफ्रेन्ड रोहन शॉलसोबत राहत असून हे दोघेही रिने आणि अलिशाला सांभाळत आहेत. हे चौघं नेहमीच धमाल करताना दिसतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us