
मोहम्मद आमीर म्हणाला की, ऑस्ट्रेलिया संघाला जसं त्यांच्या देशात जावून पराभूत करणं सोपं नाही. तसंच भारताला त्यांच्या देशात जावून पराभूत करणं शक्य नाही.

यंदाचा वर्ल्ड कप भारतात होणार असल्यामुळे भारतीय संघाला विजेतेपडदाचं प्रबळ दावेदार मानलं जात आहे. भारतीय संघाचा आताचा फॉर्म पाहता कोणत्याही संघाला भारताला पराभूत करणं जडच असणार आहे.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा हा शेवटचा वन डे वर्ल्ड कप असणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा भारताचे महत्त्वाचे खेळाडू असून त्यांच्यावर संघाची मोठी भिस्त असणार आहे. भारताचा आताचा संघ पाहता संतुलित आणि ताकदवान संघ दिसतो.

भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया संघासोबत होणार आहे. हा सामना 8 ऑक्टोबरला पार पडणार असून वर्ल्ड कपला उद्या म्हणजेच गुरूवारी पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.

Asia cup 2023 ind vs pak