
IPL मुळे फक्त नावाजलेलेल क्रिकेटपटू कोट्यधीश बनले असं नाहीय. अनेक नवखे-उदयोन्मुख खेळाडू सुद्धा मालामाल झालेत. IPL मध्ये कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या अशाचे एका खेळाडूला भर रस्त्यात चोपलं होतं. त्या मागच कारण सुद्धा विचित्र होतं.

IPL ने अनेक क्रिकेटपटूंच नशीब बदललय. त्यांना कोट्यधीश बनवलय. त्यामध्ये या खेळाडूच सुद्धा नाव आहे.

आम्ही बोलतोय मोहम्मद कैफ बद्दल. जो आता आयपीएलमध्ये खेळत नाही, कॉमेंट्री करतो. त्याची कमाई सुद्धा करोडोंमध्ये आहे.

याच मोहम्मद कैफला भर रस्त्यात मारहाण झालेली. कारण त्याने सिगारेट वेळेत आणली नव्हती.

कैफची मारहाणीची ही गोष्ट बालपणीची आहे. वडिलांनी त्याला सिगारेट आणायला पाठवलेलं. पण सिगारेट आणण्याऐवजी तो चेस खेळण्यात इतका बिझी झाला की, सांगितलेलं काम तो विसरुन गेला. वडिलांनी त्याच्यापर्यंत निरोप पोहोचवला, तेव्हा त्याच्या लक्षात आलं. जेव्हा सिगारेट घेऊन तो पोहोचला, तेव्हा वडिलांनी रस्त्यातच त्याला मारलं. वडिलांनी पहिल्यांदा त्याला मारलेलं.