आधी नको म्हणाले, नंतर रेकॉर्ड केलं ‘ते’ सदाबहार गाणं, महोम्मद रफींच्या निधनाच्या एक दिवसा आधी असं काय घडलं?

बॉलिवूडचे दिग्गज गायक मोहम्मद रफी यांच्या आवाजाची जादू आजही कायम आहे. त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से चाहत्यांना प्रेरणा देतात. असाच एक किस्सा 1980 मधील असून, त्यातून रफी यांचा स्वभाव आणि संगीताप्रती असलेली निष्ठा दिसून येते.

| Updated on: Oct 19, 2026 | 2:36 PM
1 / 5
30 जुलै 1980 रोजी रफी साहेब एका चित्रपटासाठी गाणे रेकॉर्ड करत होते. त्यांनी गाण्याचा अर्धा भाग रेकॉर्ड केला आणि निघू लागले. मात्र, निर्माते जे. ओमप्रकाश यांनी त्यांना काम पूर्ण करण्याची विनंती केली.

30 जुलै 1980 रोजी रफी साहेब एका चित्रपटासाठी गाणे रेकॉर्ड करत होते. त्यांनी गाण्याचा अर्धा भाग रेकॉर्ड केला आणि निघू लागले. मात्र, निर्माते जे. ओमप्रकाश यांनी त्यांना काम पूर्ण करण्याची विनंती केली.

2 / 5

गाण्याचे बोल ‘जिस रात के ख्वाब आए वह रात आई’ असे होते. रफी यांनी त्या दिवशी उर्वरित गाणे दुसऱ्या दिवशी पूर्ण करण्याचे सांगितले. त्यानंतर ते घरी जाण्यासाठी निघाले, महत्त्वाचं म्हणजे ते पुन्हा रेकॉर्डींग रुपमध्ये आले आणि त्यांनी सांगितलं काम उद्यावर सोडायचं नाही.

3 / 5

रफी यांनी आपले काम पूर्ण केले होते. मात्र, 31 जुलै 1980 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने संगीतविश्वाला मोठा धक्का बसला.

4 / 5

रफी यांचा जन्म 24 डिसेंबर 1924 रोजी झाला. सुरुवातीला त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. एका फकिराकडून त्यांना गाण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले जाते.

5 / 5

संगीतकार नौशाद यांच्याशी रफी यांची भेट त्यांच्या कारकिर्दीत महत्त्वाची ठरली. सुरुवातीला पैसे नसल्याने ते स्टुडिओबाहेर थांबले होते. त्यांचा स्वाभिमान पाहून नौशाद प्रभावित झाले आणि दोघांचे नाते अखेरपर्यंत टिकले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us