या अभिनेत्रीसोबत इंटीमेट सीन देताना अभिनेत्याचा ताबा सुटला, दिग्दर्शकाने कट म्हणताच केली शिवीगाळ

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने सांगितला इंडस्ट्रीमधील इंटीमेट सीन शूट करतानाचा एक धक्कादायक अनुभव. नेमकं काय घडलं?

| Updated on: Mar 11, 2026 | 6:54 PM
1 / 5
भोजपुरी आणि टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री मोनालिसा हिने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळाबद्दल एक धक्कादायक अनुभव शेअर केला आहे.

भोजपुरी आणि टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री मोनालिसा हिने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळाबद्दल एक धक्कादायक अनुभव शेअर केला आहे.

2 / 5

एका मुलाखतीत बोलताना तिने बी-ग्रेड चित्रपटांमध्ये काम करताना घडलेल्या काही घटनांचा उल्लेख केला. मोनालिसाने एका मुलाखतीत सांगितले की, कधी कधी इंटीमेट सीन शूट करताना काही अभिनेत्यांचे वागणे विचित्र होते.

3 / 5

दिग्दर्शकाने कट म्हटल्यावर एका अभिनेत्याने संतापून शिवीगाळ करत कट का बोलला? असा प्रश्न विचारल्याची घटना तिने सांगितली. तिने स्पष्ट केले की ती फक्त आपले काम आणि पात्र साकारत होती.

4 / 5

त्या सीनमधून आनंद घेण्यासाठी नाही तर केवळ कामाचा भाग म्हणून ती ते करत होती. काही लोकांच्या मनात सीनदरम्यान वेगळे विचार येत असतील असेही तिने नमूद केले.

5 / 5

मोनालिसाने सांगितले की तिला अशा सीनदरम्यान कधीही अस्वस्थ वाटले नाही. करिअरच्या सुरुवातीच्या काळात काम मिळणे महत्त्वाचे असल्याने तिने अशा चित्रपटांमध्ये काम केले आणि आज जी ओळख मिळाली आहे त्यात त्या अनुभवांचाही वाटा असल्याचे तिने सांगितले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us