जिवंतपणी स्वर्ग बघायचा असेल तर भारतातील या गावांना नक्की भेट द्या, सौंदर्य पाहून परत येऊच वाटत नाही

पावसाळ्यामध्ये गर्दीपासून दूर शांत, स्वच्छ आणि निसर्गाच्या सान्निध्यात काही दिवस घालवायचे असतील तर भारतातील ही 4 गावे आहेत खूपच सुंदर. एकदा बघाल तर पुन्हा-पुन्हा जाल.

| Updated on: Jul 28, 2026 | 4:35 PM
1 / 5
सध्या सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणचे धबधबे प्रवाहित झाले आहेत. अनेक पर्यटक ठिक-ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत. मात्र, आज आम्ही तुम्हाला भारतातील 5 गावांबद्दल सांगणार आहोत, ज्यांचे सौंदर्य पाहून लोक तिथे पुन्हा-पुन्हा जाण्याचा प्लॅन करतात.

2 / 5

मान्सूनच्या दिवसांत उत्तर भारतातील अनेक गावे हिरवाईने नटून जातात. धुक्याने वेढलेले डोंगर, शांत तलाव, दाट जंगल, स्वच्छ हवा यांचा अनोखा संगम अनुभवायचा असेल तर ही गावे पर्यटकांसाठी उत्तम पर्याय ठरू शकतात.

3 / 5

हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यातील नाको हे शांत आणि नयनरम्य गाव आहे. नाको तलाव, बौद्ध मठ, पॉपलरची झाडे आणि पारंपरिक घरे या गावाचे प्रमुख आकर्षण आहेत.

4 / 5

उत्तराखंडमधील पंगोट हे ओक आणि पाइनच्या दाट जंगलांमुळे ट्रेकिंग आणि निसर्गभ्रमंतीसाठीही हे ठिकाण लोकप्रिय आहे. तर हिमाचल प्रदेशमधील कल्पा येथील सफरचंदांच्या बागा, पारंपरिक लाकडी घरे आणि हिमालयाचे मनमोहक दृश्य यामुळे कल्पा पर्यटकांना आकर्षित करते.

5 / 5

हिमाचल प्रदेशमधील भारत-तिबेट सीमेजवळील चितकुल हे बास्पा नदीच्या काठावर वसलेले सुंदर गाव आहे. स्वच्छ हवा, निसर्गसौंदर्य आणि पारंपरिक लाकडी घरे यामुळे मान्सूनमध्ये या गावाचे आकर्षण अधिकच खुलून दिसते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us