Sweet Beer : ही बिअर साखरेहूनही गोड, किंमत फक्त 250…प्रसिद्ध ब्रँडचं नाव काय?
ज्या लोकांना कडू चव असणारी बिअर आवडत नाही, त्यांच्यासाठीच ही खास बिअर आहे. ही एक लाईट बिअर आहे. लोकांना मद्य पिताना आनंद यावा, नशा चढावी तसेच मद्यप्राशनाचा आनंद लुटता यावा यासाठी ही बिअर तयार करण्यात आली.

भारतात बिअर पिणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. रोज कोट्यवधी लोक पार्टी, तसेच इतर कार्यक्रमाच्या निमित्ताने आवडीने बिअर पितात. काही बिअर प्यायला खूपच कडू असतात. परंतु अशी एक बिअर आहे, जिची चव खूपच गोड आहे.
प्रत्येक बिअरची चव ही कडू नसते. बिअरचा असा एक ब्रँड आहे ज्यातील मद्य पिल्यास तुम्हाला ते गोड लागते. ही मूळची अमेरिकन बिअर असून तिचे नाव मिलर असे आहे. ही बिअर आपल्या हलक्या, स्मुथ चवीमुळे ओळखली जाते.
ज्या लोकांना कडू चव असणारी बिअर आवडत नाही, त्यांच्यासाठीच ही खास बिअर आहे. ही एक लाईट बिअर आहे. लोकांना मद्य पिताना आनंद यावा, नशा चढावी तसेच मद्यप्राशनाचा आनंद लुटता यावा यासाठी ही बिअर तयार करण्यात आली.
या बिअरला हलका मॉल्ट फ्लेवर असतो. बिअरच्या मद्याला मक्याचा गंध असतो. कॉर्न सिरपमुळे ही बिअर गोड लागते. म्हणूनच ती अनेकांच्या पसंतीस उतरते. या बिअरची 650ml ची बॉटल 260 रुपयांना मिळते.
टीप- मद्यप्राशन आरोग्यास हानिकारक आहे. मद्यामुळे यकृत खराब होते. मद्य प्राशनाची सवय लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आम्ही मद्यप्राशनास प्रोत्साहन देत नाही. ही स्टोरी प्राथमिक माहितीवर आधारलेली आहे.