मराठमोळ्या अभिनेत्रीची अनोखी इच्छा, कोट्यवधींची मालकीण असून करत नाही वायफळ खर्च, या कामासाठी वाचवतेय पैसे
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरचे लेहेंग्यातील काही फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. काळ्या आणि रंगीबेरंगी लेहेंग्यातील तिचा साधा पण आकर्षक अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. तिने एका मुलाखतीत शेती खरेदी करायचं माझं स्वप्न आहे, असं सांगितलेलं.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिननेत्री मृणाल ठाकूर हिते काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जे नेटकऱ्यांना प्रचंड आवडले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने परिधान केलेला ड्रेस अतिशय आकर्षक आहे.
काळ्या रंगासह रंगीबेरंगी असलेला लेहेंगा मृणालने परिधान केला आहे. ती या फोटोशूटमध्ये प्रचंड सुंदर दिसत आहे.
या फोटोशूटमध्ये मृणालने तिचे केस मोकळे सोडले आहेत. आणि एका झाडच्या आडोशाला उभी असलेली दिसून येत आहे. यावेळी तिने अनेक पोज दिल्या आहेत.
सगळ्यात विशेष बाब म्हणजे मृणालने या फोटोशूटमध्ये एकही ज्वेलरी परिधान केली नाही. दरम्यान मृणालने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, मी महागड्या कपड्यांवर जास्त खर्च करत नाही.
मला शेती करायची आहे. पण त्यासाठी मी अभिनय सोडणार नाही, असंही तिने या मुलाखतीत सांगितलं होतं. शेती घेण्यासाठी पैशांची बचत करत असल्याचंही तिने सांगितलेलं. जे कपडे मी घालते ते सर्व आऊटसोर्स केलेले असतात, असंही तिने सांगितलेलं.
मृणाल ही मुळची मराठी आहे. तिने मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू या सिनेमांमध्ये काम केलं आहे. (सर्व फोटो सौजन्या: मृणाल ठाकूर इन्स्टाग्राम)