राजाचं राणीवर जीवापाड प्रेम, पत्नीवर तीन वेळा तीन ठिकाणी दफनविधी; अजब स्टोरी माहिती आहे का?

आपल्या देशात एक असा राजा होऊन गेला आहे, ज्याने आपल्या राणीच्या मृतदेहावर तीन वेळा अंत्यसंस्कार केले होते. विशेष म्हणजे या राजाला अनेक बायका होत्या. परंतु या राणीवर त्याचा खास जीव होता.

| Updated on: Nov 13, 2025 | 9:48 PM
1 / 5
मुघलांनी भारतावर अनेक वर्षे राज्य केलं. बाबरपासून ते बहादूरशाह जफर यांच्यापर्यंत मुघल राजांनी भारतावर राजा म्हणून सत्ता गाजवलेली आहे. मुघल राजांच्या अनेक प्रेम कहाण्या आजही तेवढ्याच चर्चेचा विषय असतात.

2 / 5
यामध्ये शाहजहान आणि मुमताज यांची प्रेमकहाणी सर्वाधिक चर्चीली जाते.  वेगवेगळ्या इतिहासकारांनुसार शाहजहानने अनेक लग्नं केली. त्याला अनेक पत्नी होत्या. परंतु मुमताजविषयी त्याच्या मनात विशेष प्रेम होते

3 / 5
इतिहासकार निकोलाओ मूनची यांच्या मतानुसार शाहजहानने आपल्या शासनकाळात पत्नी म्हणून सर्वाधिक वेळ मुमताजसोबत घालवलेला आहे. मुमताज 1631 साली 14 व्या मुलाच्या जन्मादरम्यान आजारी पडली. सलग 30 तास प्रसवकळा देऊन तिचे शरीर थकल्यानंतर तिचा 17 जून 1631 रोजी मृत्यू झाला.

4 / 5
मुमताजचा मृत्यू मध्य प्रदेशातील बुऱ्हानपूर येथे झाला. तिला तिच्यावर एकूण तीन वेळा दफणविधी करण्यात आल्याचे बोलले जाते. मुमताजचा मृत्यू झाला तेव्हा शाहजहान सैन्य अभियानावर होता. त्याने तापी नदीकिनारी मुमताचा तात्पुरत्या स्वरुपात दफनविधी करावा, असा आदेश दिला होता, असे सांगितले जाते.  त्यानंतर काही महिन्यांनी मुमताजचे पार्थिव आगऱ्याला घेऊन येण्याचा आदेश देण्यात आला.

5 / 5
पुढे 8 जानेवारी 1632 रोजी यमुना नदीच्या किनारी आग्र्यातील किल्ल्याच्या जवळच मुमतावर दफनविधी करण्यात आला. तरीही त्याचे समाधान झाले नाही. नंतर त्याने यमुनेच्या किनारी ताजमहालची उभारणी करून मुमताजवर याच ठिकाणी दफनविधी करण्यात आल्याचे बोलले जाते. (टीप- या लेखातील माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा. आम्ही कोणताही दावा करत नाही.)