अंबानी कुटुंब रात्री जेवतात तरी काय? चपाती बनवणाऱ्या शेफचा महिन्याचा पगार ऐकून बसेल धक्का!

अंबानी कुटुंब साधे शाकाहारी जेवण पसंत करते. त्यांच्या अँटिलिया बंगल्यात कुटुंबासह ६०० हून अधिक कर्मचाऱ्यांसाठी रोज सुमारे ४,००० चपात्या बनवल्या जातात. कर्मचाऱ्यांना कुटुंबीयांसमान मानून त्यांना पौष्टिक अन्न देण्यासाठी हे केले जाते.

| Updated on: Dec 08, 2025 | 9:11 PM
1 / 8
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे कुटुंब जगभरातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहे. मात्र ते कायमच साधेपणाने जीवन जगत असतात.  मुकेश आणि नीता अंबानींसह त्यांचे संपूर्ण कुटुंब कडक शाकाहारी आहे. त्यामुळे त्यांच्या घरात मांसाहार कोणीही करत नाही.

2 / 8
अंबानी कुटुंबाला हॉटेलमधील किंवा खूप तेलकट पदार्थांपेक्षा घरगुती, सात्विक आणि पौष्टिक अन्न खायला आवडते.  त्यांच्या घरात प्रत्येक पदार्थाची शुद्धता आणि गुणवत्ता जपली जाते. त्यांच्या रोजच्या जेवणात साधी डाळ, भात, वेगवेगळ्या भाज्या, चपाती आणि सॅलडचा समावेश असतो.

3 / 8
अंबानी कुटुंब हे रात्री हलके आणि पचायला सोपे असे जेवण खातात. यासाठी ते नाचणी किंवा बाजरीची भाकरी, गुजराती स्टाईल भाज्या आणि सॅलड खाणे पसंत करतात. पण तुम्हाला माहितीये का? अंबानींच्या आलिशान अँटिलिया बंगल्यात दररोज सुमारे ४,००० चपात्या बनवल्या जातात. हे ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल. पण यामागे एक मोठे कारण आहे.

4 / 8
अंबानींच्या कुटुंबात बनणाऱ्या या चपात्या फक्त कुटुंबासाठी नसून अँटिलियामध्ये आठव़ड्याचे ७ दिवस २४ तास काम करणाऱ्या ६०० हून अधिक कर्मचाऱ्यांसाठी बनवल्या जातात. यात हाऊसकिपिंगचा स्टाफ, सुरक्षा रक्षक, ड्रायव्हर्स, स्वयंपाकी (Chefs), तंत्रज्ञ (Technicians) आणि अनेक वैयक्तिक सहाय्यक (Personal Assistants) यांचा समावेश असतो.

5 / 8
अंबानी कुटुंबाच्या मते त्यांच्यासाठी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्त हा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच एक आहे. त्यामुळे त्याला गरम, स्वादिष्ट आणि पौष्टिक जेवण मिळावे. यासाठी रोज इतक्या मोठ्या प्रमाणात भाकरी आणि इतर पदार्थ तयार केले जातात.

6 / 8
इतक्या मोठ्या संख्येने आणि उत्कृष्ट गुणवत्तेच्या चपाती बनवण्यासाठी विशेष व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अंबानींच्या स्वयंपाकघरात एक स्वयंचलित रोटी मेकर मशीन बसवलेले आहे. हे मशीन काही मिनिटांत शेकडो चपात्या तयार करू शकते, ज्यामुळे वेळ आणि श्रम यांची बचत होते.

7 / 8
त्यांच्याकडे चपातीसाठी मशीन असले तरी त्यांची चव आणि दर्जा उत्कृष्ट राखण्यासाठी एक खास शेफ आणि त्यांची टीम तैनात असते. अंबानींच्या घरी काम करणाऱ्या या कुशल चपातीसाठी ठेवलेल्या शेफचा मासिक पगार सुमारे ₹२ लाख आहे. या पगारासोबतच त्यांना इतर सुविधाही दिल्या जातात.

8 / 8
हा मोठा पगार फक्त कामासाठी नाही, तर त्या शेफच्या व्यावसायिकतेसाठी आहे. तो प्रत्येक रोटीचा आकार, जाडी आणि चव एकसारखी राखतो. तो कधीही जेवणाच्या गुणवत्तेशी कधीही तडजोड करत नाही. यावरून हे स्पष्ट होते की, मुकेश अंबानींच्या घरी केवळ संपत्ती नाही, तर कामगार आणि त्यांच्या कौशल्याचा आदर करण्याची तसेच सामाजिक जबाबदारी जपण्याची वृत्ती आहे.