
माध्यमांमधील बातम्यानुसार, अंबानी परिवाराच्या घरी गुजराती शाकाहारी जेवण बनवले जाते. मुकेश अंबानी यांना स्वत:ला चपाती, वरण, भात आणि सलाद असे जेवण आवडते. परंतु त्यांच्या घरात चपाती हाताने नाही तर मशीनने बनवली जाते.

मुकेश अंबानी यांच्या घरी एकावेळी एक चपाती बनवणारे रोटी मेकर नाही. एकाचवेळी शेकडो चपाती बनवणारी मशीन आहे. त्या मशीनने अगदी सॉफ्ट चपाती होते. ही मशीन वापरणे अगदी सोपे आहे.

मशीनने चपाती बनवण्यासाठी पीठ मळून घ्यावे लागत नाही. या मशीनचा एका भागात पीठ मळण्याचे काम होते. तुम्हाला फक्त पीठ आणि चवीनुसार मीठ टाकावे लागते. मग गरजेनुसार पाणी टाकल्यावर मशीन पीठ मळून देते.

पीठ मळून घेतल्यावर मशीनमध्ये सारख्या आकाराच्या चपत्या तयार होतात. या चपत्या जास्त जाड किंवा पातळ नसतात. चांगल्या सॉफ्ट चपाती त्या मशीनमध्ये तयार होतात.

मुकेश अंबानी यांच्या घरी मशीनने चपाती बनवण्याची दोन कारणे आहेत. एकतर एंटीलियामध्ये शेकडोच्या संख्येने कर्मचारी कामाला आहे. त्या सर्वांसाठी मशीनच्या चपाती तयार होतात. दुसरे म्हणजे चपाती मशीनमध्ये भाजली जाते.