
नीता अंबानी त्यांच्या आलिशान जीवनशैलीसह, त्यांचा फॅशन सेन्स आणि सौंदर्यासाठी देखील ओळखल्या जातात. पारंपारिक असो वा मॉडर्न पेहराव, नीता अंबानी या प्रत्येक फंक्शनमध्ये त्यांच्या लुक्सने लक्ष वेधून घेतात. त्यामागचं रहस्य माहीत आहे का ?

देशातील नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी यांच्या पत्नी या देखील सर्वसामान्यांप्रमाणेच एक कप चहा पिऊन दिवसाची सुरूवात करतात. पण त्या ज्या कपात चहा पितात, त्याची किंमत ऐकाल तर तुम्हाला विश्वासच बसणार नाही.

हो, हे खरं आहे. नीता अंबानी या 3 लाख रुपये किमतीच्या कपात चहा पिऊन दिवसाची सुरूवात करतात. त्या कपमध्ये असं काय खास आहे ? लाखोंमध्ये त्याची किंमत का आहे, याचा खुलासा नीता अंबानी यांनीच केला होता.

या नवाबी छंदाबद्दल एकदा नीता अंबानी स्वत:च बोलल्या होत्या. जपानमधील सर्वात जुन्या क्रॉकरी ब्रँड नोरिटेकच्या कपमध्ये चहा पिऊन मी दिवसाची सुरूवात करते, असे नीता अंबानी यांनी नमूद केले होते.

या क्रॉकरीचे वैशिष्ट्य म्हणजे याला सोन्याची बॉर्डर असून त्याच्या 50 पीसच्या सेटची किंमत दीड कोटी रुपये आहे. म्हणजेच फक्त एका कपची किंमत 3 लाख रुपये आहे.

मुकेश अंबानी यांच्या पत्नी असूनही नीता अंबानी यांची एक व्यावसायिक म्हणून स्वतंत्र ओळख आहे.