
शेअर बाजाराने गुंतवणूकदारांची झोप उडवली आहे. अनेक शेअर बाजारात तोंडावर आपटले आहेत. गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. पण मंदीतही काही शेअर संधी देत आहेत. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी या शेअर्सने अशीच कमाल करून दाखवली आहे. गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

Lloyds metals and energy शेअर्स ही कंपनी महाराष्ट्रातील बड्या लोहखनिज खाण कंपन्यांपैकी एक आहे. मार्च 2021 मध्ये या कंपनीचा स्टॉक अवघ्या 11 रुपयांवर ट्रेड करत होता. तर या 13 मार्च रोजीपर्यंत हा स्टॉक 1,141 रुपयांवर पोहचला. त्यामुळे गुंतवणूकदारांची गेल्या पाच वर्षात मोठी कमाई झाली.

Lloyds metals and energy शेअरने गेल्या पाच वर्षांत 10,854 टक्क्यांचा मोठा परतावा दिला आहे. 2021 मध्ये या कंपनीने एकाच वर्षात गुंतवणूकदारांना 905 टक्क्यांचा मोठा परतावा दिला होता. तर दोन वर्षांपूर्वी 2023 मध्ये कंपनीचा शेअर 143 टक्क्यांनी वधारला होता.

गेल्या पाच वर्षात हा शेअर सातत्याने चर्चेत आहे. या शेअरवर गुंतवणूकदार फिदा असल्याचे दिसून येते. गुंतवणूकदारांनी पडत्या काळातही हा शेअर खरेदी केल्याचे दिसून येते. तर कंपनीचा ग्राफ खाली आल्यावरही अनेकांनी हा शेअर विक्री केला नाही. गेल्या दोन वर्षात या शेअरने अनेकदा उच्चांकी कामगिरी केली आहे. हा शेअर 1613.40 या उच्चांकावर पोहचला होता.

तर पाच वर्षांपूर्वी या शेअरमध्ये ज्या गुंतवणूकदारांनी 1 लाख रुपये गुंतवले त्याचे मूल्य आता 1.09 कोटी रुपये इतके झाले आहे. चंद्रपूरमध्ये या कंपनीने औद्योगिक भरारी घेतली असून कंपनीला अजून स्टील प्रकल्प, लोहखनिज आणि इतर प्रकल्पासाठी मंजूरी मिळाली आहे. त्याचा फायदा शेअरधारकांनाही मिळत असल्याचे दिसून आले आहे.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.