Mumbai 26/11 Attack : 26/11… भळभळती जखम… शहीद स्मारकावर जात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

CM Ekanth Shinde and Devendra Fadnavis on Mumbai 26/11 Attack : शहीद स्मारकावर जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन करण्यात आलं. यावेळी कोण-कोण उपस्थित होतं? मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातील हे फोटो पाहा...

आयेशा सय्यद | Updated on: Nov 26, 2023 | 3:36 PM
1 / 5
26/11 या दिवशी 2008 साली मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात अनेकां जीव गमवावे लागले. यात पोलीस अधिकारी आणि जवानांनी प्राणांची आहुती दिली.

26/11 या दिवशी 2008 साली मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात अनेकां जीव गमवावे लागले. यात पोलीस अधिकारी आणि जवानांनी प्राणांची आहुती दिली.

2 / 5

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी आणि जवानांना वीर मरण आलं. यांच्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात पोलीस स्मारकाला उभारण्यात आलं आहे.

3 / 5

याठिकाणी आज या हुतात्मांना अभिवादन करण्यात आलं. पोलीस आणि लष्कराच्या जवानांना शहीद स्मारकावर पुष्पांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पांजली अर्पण केली.

4 / 5

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय या ठिकाणी जात आदरांजली अर्पण केली. शहिदांच्या स्मृतींना पुष्पचक्र अर्पण केलं.

5 / 5

राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगल प्रभात लोढा, दीपक केसरकर, डीजीपी, सीपी हे देखील उपस्थित होते. यावेळी 26/11 च्या हल्ल्याच्या भळभळत्या जखमेवर भाष्य करण्यात आलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us