AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mundhe: तुकाराम मुढेंच्या FDA ला मोठा दणका, पहिल्यांदाच कोर्टाने…. थेट 5 लाखांचा दंड ठोठावला; तो निर्णयही फिरवला!

Bombay Hight Court Slams FDA: अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे हे खाते आल्यापासून त्यांनी अनेक भेसळयुक्त दुकानांवर कारवाई करुन त्यांचे परवाने रद्द केले आहेत. पण आता याच एफडीच्या एका कारवाईवर मुंबई उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

Tukaram Mundhe: तुकाराम मुढेंच्या FDA ला मोठा दणका, पहिल्यांदाच कोर्टाने.... थेट 5 लाखांचा दंड ठोठावला; तो निर्णयही फिरवला!
| Updated on: Aug 17, 2026 | 10:07 PM
Share

Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढे हे नाव सध्या चर्चेचा विषय बनला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. आतापर्यंत तुकाराम मुंढे यांनी अनेक ठिकाणी कारवाई केल्या याबद्दल त्यांचे कौतुक झाले पण आता पहिल्यांदाच त्यांना दणका बसला आहे.  मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारभारावर कडक ताशेरे ओढले आहेत. कायदेशीरपणे नियमांचे पालन करूनही पुण्यातील एका मिठाईच्या दुकानाचा परवाना निलंबित करणाऱ्या एफडीएला मुंबई उच्च न्यायालयानं सोमवारी चांगलाच दणका दिलाय.

प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र व्ही. घुगे आणि न्यायमूर्ती गौतम ए. अंखड यांच्या खंडपीठाने पुण्यातील मिठाईच्या दुकानाचा परवाना निलंबित करण्याचा एफडीएचा आदेशावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. एफडीएचा कारवाईचा हेतू कौतुकास्पद असला तरी आता तरी त्याचा अतिरेक आहे. दंडाची ही रक्कम एका महिन्याच्या आत दुकान मालकाला सुपूर्द करण्याचे आदेश देत प्रशासनानं रद्द केलेला त्याचा परवाना तातडीनं पूर्ववत करून त्याला व्यवसाय सुरू करण्याची परवानगीही हायकोर्टानं दिली. हायकोर्टानं याप्रकरणी एफडीएला थेट 5 लाखाचा दंड ठोठावला.

हायकोर्टाची प्रतिक्रिया

सुनावणीदरम्यान हायकोर्टाने एफडीएच्या धोरणावर ताशेरे ओढले आहे. खंडपीठाने म्हटले आहे की “हा पूर्णपणे मनमानी कारभार आहे. FDA चे कारवाईचे धोरण अजब आहे. दुकानाला 98 टक्के गुण मिळूनही तुम्ही त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागण्यास सांगता. हे काय चालले आहे? हा सामान्य नागरिकांना त्रास देण्याचा प्रकार आहे.”

नेमकं काय घडलं?

12 जून: अन्नातून विषबाधा झाल्याची तक्रार व स्वच्छतेच्या कारणावरून एफडीएने दुकानाचा परवाना निलंबित केला.

15 जून: दुकानदाराने या निर्णयाला आव्हान दिले.

9 जुलै: दुकानदाराने सर्व अटींची पूर्तता केल्याचा अहवाल सादर केला.

पुनर्तपासणी: एफडीएने केलेल्या पुनर्तपासणीत दुकानाला 36 पैकी 35 गुण (98% स्वच्छता) मिळाले. एवढे गुण मिळूनही एफडीएने परवाना पूर्ववत करण्यास नकार दिला आणि दुकान बंद ठेवले.

याचिकाकर्त्याचे वकील अभिजित देसाई यांनी कोर्टात सांगितले की, 34 दिवस दुकान बेकायदेशीरपणे बंद राहिल्यामुळे त्यांना थेट 8.5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे त्यांना खूप मोठा फटका बसला आहे.

Follow Us
राष्ट्रवादीच्या सतीश पाटलांची निमवडणुकीतून माघार; म्हणाले, जेव्हा...
NCP : राष्ट्रवादीच्या सतीश पाटलांची निमवडणुकीतून माघार; म्हणाले, जेव्हा स्वतःच्याच पक्षाकडून फसवणूक...
साताऱ्यातील तारळी प्रकल्पाचे काम थांबवले; अदानी एनर्जीचे अधिकारी...
साताऱ्यातील तारळी प्रकल्पाचे काम थांबवले; अदानी एनर्जीचे अधिकारी मंत्रालयात...
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; कोण कोण आहे रिंगणात?
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; कोण कोण आहे रिंगणात?
श्रद्धांजली वाहीली नाही, तर बाळासाहेबांचं महत्त्व कमी होत नाही; - राऊत
श्रद्धांजली वाहीली नाही, तर बाळासाहेबांचं महत्त्व कमी होत नाही; संजय राऊतांचा भाजपवर पटलवार
बाळासाहेबांचा वारसा हवा, पण हिंदुत्व नको? राहुल गांधींच्या मुद्द्यावरू
बाळासाहेबांचा वारसा हवा, पण हिंदुत्व नको? राहुल गांधींच्या मुद्द्यावरून नवनाथ बनांचा ठाकरे गटाला टोला!
अमित शहा अन् एकनाथ शिंदे यांच्यात महत्त्वाची बैठक; महाराष्ट्राच्या...
अमित शहा अन् एकनाथ शिंदे यांच्यात महत्त्वाची बैठक; महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण!
गोकुळ दूध महागणार! ग्राहकांना प्रति लिटर 4 रुपये अधिक मोजावे लागणार?
गोकुळ दूध महागणार! ग्राहकांना प्रति लिटर 4 रुपये अधिक मोजावे लागणार? शेतकऱ्यांनाही...
दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील वडिलोपार्जित घरावर आज बुलडोझर; BMC कडून...
दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील वडिलोपार्जित घरावर आज बुलडोझर; BMC कडून मोठी कारवाई!
मोठी बातमी! राज्यातील आणखी 4 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पहा यादी...
मोठी बातमी! राज्यातील आणखी 4 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पहा यादी...
लातूरमध्ये फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी एजंटची मुजोरी! शेतकऱ्याच्या...
लातूरमध्ये फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी एजंटची मुजोरी! शेतकऱ्याच्या कुटुंबाला शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल