AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे यांचा एक निर्णय अन् दूधाचा पुरवठा विस्कळीत! लोकांचे होणार वांदे

Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढे यांची सध्या खूप चर्चा सुरु आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे हे पद येताच त्यांनी सर्वत्र धाडी टाकायला सुरुवात केली आहे.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे यांचा एक निर्णय अन् दूधाचा पुरवठा विस्कळीत! लोकांचे होणार वांदे
| Updated on: Aug 17, 2026 | 3:14 PM
Share

तुकाराम मुंढे यांची सध्या खूप चर्चा सुरु आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे हे पद येताच त्यांनी सर्वत्र धाडी टाकायला सुरुवात केली आहे. आता यानंतर दूधाबाबत एक प्रकार समोर आला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश असून, येथील एकूण उत्पादन 248 दशलक्ष टन आहे. दरम्यान,  दुधाचा देशांतर्गत वापर आणि मागणी सुमारे 240 दशलक्ष टन असण्याचा अंदाज आहे. याचा अर्थ असा की, दूध उत्पादनाचा मोठा भाग दुधाच्या स्वरूपातच वापरला जातो. प्रश्न असा निर्माण होतो की, हॉटेल्स, मिठाईची दुकाने, चहाची दुकाने, अन्न प्रक्रिया उद्योग आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये वापरले जाणारे दूध येते कुठून? तर भेसळीच्या दैनंदिन घटनांवरून हे स्पष्टपणे दिसून येते की, देशात मोठ्या प्रमाणावर भेसळीचा व्यापार अव्याहतपणे सुरू आहे.

या व्यापारात केवळ भेसळयुक्त दूधच नव्हे, तर भेसळयुक्त चीज, तूप आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचाही समावेश आहे. पुरवठा आणि मागणी यांच्यातील प्रचंड ताण, तसेच अधिक नफ्याची लालसा, यामुळे भेसळ करणाऱ्यांना मार्ग मोकळा झाला आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. आता भेसळ जर थांबवली तर खऱ्या अर्थाने भारतात दूधाचा पुरवठा कमी होईळ.

देशातील दूध उत्पादन आणि वापराचे गणित 1950 मध्ये 17 दशलक्ष टन असलेले उत्पादन 2025 मध्ये 247 दशलक्ष टनांपेक्षा जास्त झाले. 2024-25 मध्ये ते 247.87 दशलक्ष टन होते, म्हणजेच अंदाजे 247.9 दशलक्ष टन. हे 2023-24 मधील 239.30 दशलक्ष टनांपेक्षा 3.58% जास्त आहे. दरडोई दुधाची उपलब्धता दररोज 485 ग्रॅम होती.

जरी सरकार दरवर्षी उत्पादनाप्रमाणे एकूण वापराची स्वतंत्र आकडेवारी जाहीर करत नसले तरी, उपलब्ध अधिकृत घरगुती वापर खर्च सर्वेक्षणानुसार 2023-24 मध्ये ग्रामीण भागात दरडोई सरासरी मासिक दूध वापर 5.085 लिटर आणि शहरी भागात दरडोई 5.686 लिटर होता. हे अंदाजे दररोज प्रति व्यक्ती 170-190 मिली इतके होते. यामध्ये हॉटेल्स, मिठाईची दुकाने, चहाची दुकाने, अन्न प्रक्रिया आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या दुधाचा समावेश नाही.

कोणत्या राज्यात किती दुधाचा वापर?

पंजाब, राजस्थान आणि हरियाणा येथे सर्वाधिक दुधाचा वापर होतो. पंजाबमध्ये दरडोई सरासरी दैनिक दूध वापर 1245 ग्रॅम आहे, तर राजस्थानमध्ये तो 1171 ग्रॅम आहे. हरियाणात, एक सामान्य व्यक्ती दररोज 1105 ग्रॅम दुधाचे सेवन करते.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी