
अंधेरी पूर्व येथील मरोळ पाईपलाईन मार्ग येथे अंधेरी विकास मंच यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महासंमेलन कार्यक्रमाला उपस्थित राहून जमलेल्या मुंबईकर नागरिकांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.

राज्यात नऊ महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या महायुती सरकारने कायमच सर्वसामान्य नागरिकांना प्रमाण मानून कार्य केले असून त्यांच्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे अशी पोस्ट मुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडियावर आहे.

मुंबईचा चेहरामोहरा बदलण्यासाठी येत्या काळात या शहरात अनेक विकास प्रकल्प राबविण्यात येणार असून त्याद्वारे नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. सर्वांच्या पोटाला दोन वेळचे अन्न देणारे शहर अशी या मुंबई शहराची ओळख असून या शहरात आलेल्या प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्यासाठी हे सरकार काम करेल अशी ग्वाही याप्रसंगी दिली.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही करत असून त्यामुळेच अनेक जुनेजाणते शिवसैनिक आज आमच्यासोबत जोडले जात आहेत.

आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून जुने शिवसैनिक कमलेश राय यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यासमयी त्यांचे पक्षात स्वागत करताना त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी खासदार गजानन किर्तीकर, शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, शिवसेना प्रवक्ते कृष्णा हेगडे, शिवसेना प्रवक्त्या सौ.शीतल म्हात्रे, शिवसेना महिला संघटक सौ.कला शिंदे, शिवसेनेचे सर्व स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच मरोळ विभागातील रहिवासी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.