AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis: बंडोबांना थंड करण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री मैदानात; त्या फॉर्म्युल्याची जोरदार चर्चा, नाराज निष्ठावंताचं बंड शमेल का?

Devendra Fadnavis on Rebel: सरते वर्ष भाजपच्या बंडोबांनी खास गाजवले. निष्ठावंतांचा आक्रोश, टाहोंनी अनेक शहरातील आकाश दणाणून गेले. काहींनी अन्नत्याग सुरु केला. तर काहींनी मंत्रिमहोदयांच्या कारला घेराव घातला. कुणाला भोवळ आली, कुणाला भावनावेग आवरता आला नाही. या सर्व नाराजीची दखल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.

Devendra Fadnavis: बंडोबांना थंड करण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री मैदानात; त्या फॉर्म्युल्याची जोरदार चर्चा, नाराज निष्ठावंताचं बंड शमेल का?
देवेंद्र फडणवीस
| Updated on: Jan 01, 2026 | 9:37 AM
Share

CM Devendra Fadnavis on Rebel: सरते वर्षे भाजपच्या अनेक निष्ठावंतांसाठी धक्कादायक ठरले. गेल्या दहा वर्षांपासून नगरसेवक होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या अनेकांच्या स्वप्नांचा एका क्षणात चुराडा झाला. मग त्यांच्या दु:खाला पारावार उरला नाही. ज्या साहेबांसाठी पायाला भिंगरी लावून फिरलो. कार्यकर्ते जमा केले. पक्षाच्या सतरंज्यापासून ते मंडप टाकण्याची कामं केली. पक्षासाठी खस्ता खाल्या. अनेक कार्यक्रम राबवले. त्याला मंत्रिमहोदय उद्धघटनासाठी आले पण उमेदवारी कापली गेल्यानंतर हेच साहेब फोन सुद्धा घेत नसल्याने निष्ठावंतांनी टाहो फोडला. कुणाला भोवळ आली, कुणाला भावनावेग आवरता आला नाही. या सर्व नाराजीची दखल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.

बंडखोरांना शांत करण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री मैदानात

राज्यातील प्रमुख शहरातील बंडखोरांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून संपर्क करण्यात येत आहे. पक्षातील निष्ठावंतांशी स्वतः मुख्यमंत्री बोलले आहेत.निवडणुकीत माघार घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांचा अनेक अपक्षांसोबत संवाद झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.बंडखोरी शमवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून बंडखोरांना राजकीय पुनर्वसनाचा शब्द दिल्याचीही माहिती समोर येत आहे. तर काही बंडखोरांना शांत करण्याची जबाबदारी स्थानिक नेत्यांवर सोपविण्यात आल्याचेही समजते.

स्थानिक बंडखोरी वेळीच रोखण्यासाठी स्थानिक नेते आता अनेक बंडखोरांच्या घरी जाऊन त्यांना समजावून सांगत असल्याचे समजते. या नेत्यांनी त्यांना भाजपची पक्ष शिस्तसह संयमाची आठवण करुन दिल्याचे समजते. त्यांच्या कुटुंबियांशी ही बडी नेते संवाद साधत आहेत. त्यातील काहींनी तर आपल्याला किती वर्षानंतर पक्षाने न्याय दिला याची उजळणी करत आहेत. बंडखोरांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

गोरेगाव भाजप बंडखोर उमेदवाराची मनधरणी करण्यात भाजपला यश

मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून अपक्ष उमेदवार संदीप जाधव यांची मनधरणी करण्यात आली.अमित साटम यांच्या मध्यास्थितीमुळे अखेर उमेदवार संदीप जाधव आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचे समजते.गोरेगाव विधानसभा मतदारसंघात भाजपाचे महामंत्री संदीप जाधव हे प्रभाग क्रमांक 54 मध्ये मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते.भाजपाच्या सर्वे मध्ये त्यांच्या नाव येऊन सुद्धा प्रभाग क्रमांक 54 मधून त्यांना उमेदवारी न देता विप्लव अवसरे यांना उमेदवारी देण्यात आली होती.

यानंतर नाराज संदीप जाधव यांनी पक्षाला राम राम करून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेत.उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी संदीप जाधव यांची भेट घेतली.यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी संदीप जाधव यांना भविष्यात मुंबई भाजपा कार्यकारणी मध्ये त्यांना स्थान देण्यात येईल त्यांच्या सन्मान राखला जाईल असा आश्वासन दिले. मुंबई शहरात भगवा झेंडा फडकवण्यासाठी देवा भाऊच्या नेतृत्वात काम करून देशासाठी आणि मुंबईसाठी काम केला पाहिजे असा आव्हान केले.त्यामुळे अमित साटम यांच्या मन धरणी मुळे संदीप जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज आज माघार घेत आहेत.यावेळी संदीप जाधव आपला अपक्ष उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतर भाजप चे अधिकृत उमेदवार विप्लव अवसरे यांच्या प्रचार करून त्यांना निवडून आणतील असा विश्वास मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.