AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis: अजितदादांचे अकाली निधन आणि 9 मिनिटातच मंत्रालयात खिरापत… देवेंद्र फडणवीसांची मोठी कारवाई, अपडेट काय?

CM Devendra Fadnavis : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादांच्या मृत्यूच्या 9 मिनिटानंतर एक मोठा निर्णय घेण्यात आला. पण आता मुख्यमंत्र्यांनी त्यावर मोठी कारवाई केली आहे. सोमवारी याविषयीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Devendra Fadnavis: अजितदादांचे अकाली निधन आणि 9 मिनिटातच मंत्रालयात खिरापत... देवेंद्र फडणवीसांची मोठी कारवाई, अपडेट काय?
देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार, मंत्रालयImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Feb 17, 2026 | 11:21 AM
Share

CM Devendra Fadnavis: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मोठा निर्णय घेतला. त्या 75 विद्यालयांना दिलेला अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांच्या दर्जाला स्थगिती देण्यात आली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या निधनानंतर लागलीच या विद्यालयांना मंजूरी देण्यात आली होती. शासकीय दुखवटा असताना या शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. ही बाब समोर येताच मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली. तर उपमुख्यमंत्री आणि अल्पसंख्यांक विकास मंत्री सुनेत्रा पवार यांनी याप्रकरणी अधिकाऱ्यांनी अल्पसंख्यांक प्रमाणपत्र वाटपाप्रकरणी चौकशीचे आदेश दिले. याप्रकरणी अनियमितता आढळली तर कडक कारवाईचे निर्देश दिले.

दादांच्या मृत्यूनंतर 9 मिनिटात पहिले प्रमाणपत्र

अधिकाऱ्यानुसार, 28 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान 75 संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आला. पहिले प्रमाणपत्र 28 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजून 9 मिनिटांनी वाटप करण्यात आले. त्याच दिवशी अजितदादांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. त्याच दिवशी सात संस्थांना मान्यता देण्यात आली. तर पुढील तीन दिवसात ही संख्या थेट 75 संस्थांवर पोहचली. विशेष म्हणजे या काळात राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखावटा लागू होता. तरीही हा प्रकार घडला. त्यामुळे त्यात काळेबेरे झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यानंतर याप्रकरणी अल्पसंख्यांक दर्जा देण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला.

सुनेत्रा पवारांचे कडक कारवाईचे निर्देश

अजितदादा यांच्या अकाली निधनानंतर हे खातं आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले आहेत की, या काळात ज्या मान्यता, अनुदान वाटप अथवा प्रमाणपत्र देण्याचा जो निर्णय घेण्यात आला आहे, त्याची व्यापक चौकशी होईपर्यंत या निर्णयाला स्थगिती देण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. तर सुनेत्रा पवार यांनी याप्रकरणी चौकशी आणि कडक कारवाईचे निर्देश दिले आहे. तर शरद पवार राष्ट्रवादीने हा सर्व प्रकार गंभीर असून सीआयडी चौकशीची मागणी केली आहे. तर याप्रकारावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच चौकशीची मागणी केली आहे.

Follow Us
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी खाद्य तेलाबाबत घोषणा केलीच...
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी घोषणा केलीच...  खाद्य तेलाबाबत एफडीएकडून कडक नियमावली
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरेंवर
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरे गटावर निशाणा!
पोलिस संरक्षण काढून ये मग... फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर,
Video : पोलिस संरक्षण काढून ये मग...  फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर, थेट बुलेटस्वारी करत स्वीकारलं चॅलेंज
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत, असं काही घडलं की...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कोर्टात काय...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कामत यांचा युक्तिवाद, ठाकरेंना जिंकून देणार?