AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओमराजे निंबाळकर भाषणाला उभे राहताच आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी, थेट म्हटले, इथे येऊन मी..

ओमराजे निंबाळकर यांनी नुकताच पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिली. मात्र, विद्यार्थ्यांनी यादरम्यान काही घोषणा दिल्या, ज्यानंतर ओमराजे निंबाळकर यांना आपले भाषण आटपते घ्यावे लागले. विद्यार्थ्यांनी ओमराजेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

ओमराजे निंबाळकर भाषणाला उभे राहताच आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी, थेट म्हटले, इथे येऊन मी..
Omraje Nimbalkar
| Updated on: Oct 05, 2026 | 7:37 AM
Share

पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या विद्यार्थ्यांच्या काही मागण्या आहेत, त्याकरिता हे आंदोलन सुरू आहे. या विद्यार्थ्यांच्या भेटीला खासदार ओमराजे निंबाळकर पोहोचले होते. मात्र, विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ओमराजे निंबााळकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल. ओमराजे निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना म्हटले की, तुमची परीक्षा आयुष्यभरासाठी आहे, आमची निवडणुक 5 वर्षापुरती आहे. आमच्या पेक्षा तुमच्या यातना खुप जास्त आहेत. मला तुमच्या ज्या मागण्या आहेत, त्या मागण्या मान्य आहेत. सर्वसामान्य मानसाच्यासोबत जसा माझा कनेक्ट आहे तसाच आहे. यावेळी मुले घोषणा देत होते की, शिंदे साहेबांना फोन लावून राजीनामा मागा…

दोघांच्या ज्या मागण्या आहेत. तुम्हाला पाठिंबा द्यायला आलो माझं चुकलं का….? असा सवालच ओमराजे निंबाळकर यांनी यादरम्यान केला. तुमची भावना 100 टक्के सरकारपर्यंत पोहचवेल, अशी ग्वाही सरकारला ओमराजे निंबाळकर यांनी दिली. एमपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा कोणाला घेता येतो…असेही त्यांनी म्हटले. विद्यार्थ्यांची समजूत काढताना ओमराजे निंबाळकर दिसले.

ओमराजे निंबाळकर यांचे भाषण सुरू असताना विद्यार्थ्यांनी गो बॅकच्या घोषणा दिल्या. काही झाले तेव्हा मी सामान्य माणसाची साथ सोडली नाही. ओमराजे मी असाच झालो नाही लय खालून धडका घेऊन झालो आहे, असेही त्यांनी म्हटले. पक्षांतरांचा विषय प्रामाणिक सांगायचा आहे… 24 तास मतदारसंघासाठी खपतय….त्या मतदारसंघात जेव्हा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकाच्या निवडणुका झाल्या आमची एक पंचायत समिती यायची लायकी नव्हती का….?

सत्तेशिवाय माणसं काम करू शकत नाही, यामुळे आमचा पराभव झाला. राजीनाम्यासंदर्भात तुमचा विषय घेऊन मी सीएम साहेबांना भेटुन विनंती करेल, असेही ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले. तुमची मागणी आहे, स्पर्धा परीक्षेच्या अध्यक्षाची राजीनामाची. तुमचा विषय घेऊन मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटतो. तुमचीजी मागणी आहे, त्यावर कारवाई करण्याची मागणी मी करतो. विद्यार्थ्यांचा रोष बघता ओमराजे निंबाळकर यांनी आपले भाषण आटपते घेतले.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात