युक्रेनने थेट भारताबद्दल केले धक्कादायक विधान, राष्ट्राध्यक्षाचा संताप, थेट म्हटले, तुम्ही यापूर्वी कधी…
रशिया आणि युक्रेन युद्ध पेटले असून याचा फटका सर्वांना बसत आहे. त्यामध्ये युक्रेनच्या अध्यक्षांनी भारताबद्दल धक्कादायक विधान केल्याने मोठी खळबळ उडाली. त्यांनी थेट भारताचे नाव घेत मोठे विधान केले.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर युक्रेकडून ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर मोठी खळबळ उडाली. युक्रेनने केलेल्या चुकीची किंमत संपूर्ण जगालाही मोजावी लागू शकते. पुतिन यांना थेट झोपीमध्ये मारण्याचा कट युक्रेनचा होता. रशियाच्या सैन्याने युक्रेनचा कट उधळून टाकला. पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्यांच्या वृत्तांवर चिंता व्यक्त केली गेली. पुतिन यांच्यावर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न युक्रेनने केल्याचे कळताच जगातील अनेक देशांनी संताप व्यक्त केला. हेच नाही तर अमेरिकेच्या अध्यक्षांनीही थेट पुतिन यांना फोन करत चर्चा केली. चीन आणि भारतानेही याचा विरोध केला. पुतिन यांच्यावरील ड्रोन हल्ल्याबद्दलची माहिती मिळताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगेचच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याचा निषेध केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या पोस्टनंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांचा चांगलाच जळफळाट उठला आहे. वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी आता भारतावर टीका केली. वोलोडिमिर झेलेन्स्की यांचे म्हणणे आहे की, असा कोणत्याही प्रकारचा हल्ला युक्रेनने केला नाहीये. हेच नाही तर रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी यादरम्यान भारतावर दुटप्पीकरणाचा थेट आरोप केला आहे. ही दुसरीवेळ आहे की, झेलेन्स्की भारतावर टीका करत आहेत.
झेलेन्स्की म्हणाले की, भारतासह काही देश जे पुतिन यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याचा निषेध करत आहेत, त्यांनी आमच्या मुलांवर झालेल्या हल्ल्यांबद्दल कधीही काहीही म्हटले नाही. झेलेन्स्की यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, जर खरोखरच सांगायचे झाले तर भारत, यूएई आणि अजून काही देश पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचा निषेध करत आहेत. ही बाब खरोखरच निराशाजनक आहे.
रशियाकडून आमच्या लहान मुलांवर हल्ले होत आहेत आणि लोक मारले जात आहेत. मात्र, याचा निषेध करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. मी भारताकडून किंवा संयुक्त अरब अमिरातीकडून कोणताही निषेध ऐकलेला नाही. रशियाने 29 डिसेंबर रोजी दावा केला होता की, युक्रेनने 91 ड्रोनच्या मदतीने नोव्हगोरोड प्रदेशातील राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जगात खळबळ उडाली.
