Mumbai Ganesh Visarjan: ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण, ‘पुढच्या वर्षी लवकर या’ ची आर्जव, भाविकांकडून लाडक्या बाप्पााला निरोप, विसर्जनाची क्षणचित्रे
Mumbai Ganesh Visarjan: लाडक्या बाप्पााला निरोप देण्यासाठी भक्तांची तुडुंब गर्दी उसळली. मुंबईतील समुद्रकिनारे गर्दीने फुलून गेले. तर पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नाशिकमध्ये भाविकांनी लाडक्या बाप्पाला मनोभावे निरोप दिला.

सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये गणेश भक्तांचा भक्तीला उधाण आले.ढोल ताशांचा गजर पारंपरिक वाद्यात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे.
मुंबईचा राजा, परळचा महाराजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, करी रोडचा कैवारी, तेजुकाया असे अनेक गणपती मार्गस्थ झालेले दिसले.
शहर आणि जिल्ह्यात गणेश विसर्जन सोहळा शांततेत पार पडला. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर टाळत अनेक गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिलं. ढोल-ताशा, लेझीम, तर काही ठिकाणी टाळ-मृदुंगाच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
पाईपलाईनचा महाराजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी अनेक गणपती बाप्पा रांगेत दिसले. विसर्जनासाठी मोठी गर्दी, एकामागे एक गणपती विसर्जनासाठी रांगेत उभे आहेत.
मुंबईच्या विघ्नहर्ता गणरायाचे आगमन झालं असून उंदीर मामा समोर उभी सुंदर अशी मूर्ती भक्ताचे आकर्षण ठरली. अनेक गणेश मंडळांच्या देखाव्यांनी भक्तांचे मन वेधले.
राज्यातील अनेक भागात गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांनी ढोल ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करत लाडक्या बाप्पाला भाविकांनी निरोप दिला.