PHOTO: सरकारचा आदेश केराच्या टोपलीत; लोकल ट्रेनमध्ये नियमांचा फज्जा

लोकांनी असेच वागायचे ठरवले तर कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा कसा घालायचा, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. | Coronavirus Local train Mumbai

Rohit Dhamnaskar | Updated on: Apr 05, 2021 | 9:17 AM
1 / 8
राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या ब्रेक द चेन मोहीमेला रेल्वे प्रवाशांकडून केराची टोपली दाखवण्यात आली.

राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या ब्रेक द चेन मोहीमेला रेल्वे प्रवाशांकडून केराची टोपली दाखवण्यात आली.

2 / 8

मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकात प्रवाशी नियमांचे सर्रास उल्लंघन करताना दिसून आले.

3 / 8

रेल्वेत केवळ प्रवाशांनी बसून प्रवास करावा. उभे राहून गर्दी करु नये, असे निर्देश शासनाने दिले होते.

4 / 8

मात्र, सोमवारी प्रवाशी या नियमाला हरताळ फासताना दिसून आले.

5 / 8

अनेक प्रवासी फुटबोर्डवर उभे राहून प्रवास करत होते.

6 / 8

या सगळ्यामुळे लोकल ट्रेनमधून होणारा कोरोनाचा प्रादुर्भाव कसा रोखणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

7 / 8

रेल्वे स्थानकांमधील पादचारी पुलांवरही लोकांची मोठ्याप्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे. यावेळी लोक नियमांची तमा न बाळगता एकमेकांना खेटून चालताना दिसत आहेत.

8 / 8

लोकांनी असेच वागायचे ठरवले तर कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा कसा घालायचा, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us