मुनव्वर फारूकी आणि अंकिता लोखंडे यांच्यामधील वाद वाढला, थेट केला ‘हा’ आरोप
अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत बिग बाॅस 17 च्या घरात सहभागी झालीये. अंकिता आणि विकी यांच्यामध्ये घरात मोठे वाद होताना दिसले. इतकेच नाही तर अंकिता लोखंडे हिने पती विकी जैन याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. आता मुनव्वर फारूकी आणि अंकिता यांच्यामध्ये वाद झालाय.
1 / 5

बिग बाॅस 17 चांगलेच धमाका करताना दिसत आहे. बिग बाॅस 17 बद्दल चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ ही बघायला मिळते. सध्या घरात मोठे हंगामे होताना दिसत आहेत.
2 / 5

मुनव्वर फारूकी आणि अंकिता लोखंडे यांच्यामध्ये घरात एक चांगलीच मैत्री बघायला मिळाली. मात्र, आता अंकिता लोखंडे आणि मुनव्वर फारूकी यांच्यामध्ये वाद वाढताना दिसतोय.
3 / 5

नुकताच एक टास्क बिग बाॅसच्या घरात पार पडला. या टास्कमध्ये अंकिता लोखंडे हिच्या अंगावर चिखल टाकताना मुनव्वर फारूकी हा दिसला.
4 / 5

इतकेच नाही तर मुनव्वर फारूकी याने अंकिता लोखंडे हिला थेट घमंडी देखील म्हटले आहे. अंकिता लोखंडे कामयच मी मी करत असते असेही सांगताना मुनव्वर फारूकी दिसला.
5 / 5

मुनव्वर फारूकी आणि अंकिता लोखंडे यांच्यामधील वाद हा सतत वाढताना दिसतोय. मनारा चोप्रा हिच्यामुळे हा वाद वाढत असल्याचे सांगितले जातंय.
Follow Us