Mutton : मटण शिजवताना करा ही स्मार्ट ट्रिक; तुकडे होतील मऊ, मसालेदार ग्रेव्हीला येईल जबरदस्त चव
जर तुम्हाला मटणाचा बाहेरील भाग हा कुकरमध्ये शिजल्यासारखा हवा असेल तर, तुम्ही हे मटणात घातलंच पाहिजे. यामुळे मटणाचे तुकडे मऊ होतील, ग्रेव्ही घट्ट होईल आणि हे मटण चवीला एकदम टेस्टी लागेल. मटण करी अधिक स्वादिष्ट कशी बनवायची, यासाठी पुढील माहिती नक्की वाचा.

साहित्य: मटण: १/२ किलो, कांदे: १ मोठा, १ छोटा, हिरव्या मिरच्या: ४, आले-लसूण पेस्ट: २ चमचे, हळद: १/२ चमचा, तिखट: ३ चमचे, मीठ: १ चमचा, गरम मसाला: २ चमचे, धणेपूड: १ चमचा, टोमॅटो पेस्ट: १ टोमॅटो, कढीपत्ता: १ काडी, कोथिंबीर: बारीक चिरलेली. तेल: ५ चमचे, पाणी: दीड चहाचा ग्लास.
सर्वप्रथम, गॅसवर प्रेशर कुकर ठेवा आणि त्यात दोन मोठे चमचे तेल घालून गरम करा. तेल गरम झाल्यावर, त्यात एक मोठा कांदा आणि दोन हिरव्या मिरच्या घालून सोनेरी तपकिरी होईपर्यंत परता. कांदा किंचित तपकिरी झाल्यावर, स्वच्छ केलेले पाव किलो मटणाचे तुकडे घालून तेलात दोन मिनिटे परता.
पुढे, एक चमचा आले-लसूण पेस्ट घालून त्याचा कच्चा वास पूर्णपणे जाईपर्यंत परतून घ्या. आता, पाव चमचा हळद, एक चमचा तिखट, एक चमचा मीठ, एक चमचा गरम मसाला घालून चांगले मिसळा, जेणेकरून मसाले मटणाच्या तुकड्यांना व्यवस्थित लागतील. शेवटी, एक लहान चहाचा ग्लासभर पाणी घालून कुकरचे झाकण लावा आणि तीन शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. यामुळे मटण मऊ होण्यास मदत होते.
मटण शिजत असताना, गॅसवर एक पॅन ठेवा आणि त्यात तीन मोठे चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यावर, त्यात एक छोटा कांदा, दोन हिरव्या मिरच्या आणि कढीपत्त्याची एक काडी घालून चांगले परतून घ्या. ते थोडे तपकिरी झाल्यावर, त्यात एक मोठा चमचा आले-लसूण पेस्ट घालून कच्चा वास जाईपर्यंत परता. नंतर, त्यात पाव चमचा हळद, दोन चमचे लाल तिखट आणि एक चमचा धणेपूड घालून मंद आचेवर एक मिनिटभर परतून घ्या.
आता, एका टोमॅटोपासून काढलेली टोमॅटो पेस्ट घालून, त्याचा कच्चा वास पूर्णपणे जाईपर्यंत परतून घ्या. प्रथम, कुकरमध्ये शिजवलेले मटण पाण्यासकट या ग्रेव्हीमध्ये घाला. अर्धा कप पाणी घालून, व्यवस्थित मिसळा, झाकण ठेवून दहा मिनिटे शिजवा. दहा मिनिटांनंतर, जर तुम्ही झाकण काढले, तर तुम्हाला दिसेल की तेल वर आले आहे आणि ग्रेव्ही घट्ट झाली आहे. शेवटी, एक चमचा गरम मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून, एक-दोन मिनिटे शिजवून गॅस बंद करा.